अमळनेर नगर परिषद परिक्षेत्रातील व्यापक जनहिताच्या प्रलंबित कामाच्या प्रस्तावांना मान्यता द्या माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्र
![]()
अमळनेर नगर परिषद परिक्षेत्रातील व्यापक जनहिताच्या प्रलंबित कामाच्या प्रस्तावांना मान्यता द्या
माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्र
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर नगरपरिषद अंमळनेर जिल्हा जळगाव च्या परीक्षेतील व्यापक जनहिताच्या प्रलंबित कामाच्या प्रस्तावांना मान्यता मिळावी यासाठी नामदार गुलाबराव पाटील मंत्री पाणीपुरवठा स्वच्छता पालकमंत्री जळगाव यांना नुकतेच पत्र माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील यांनी दिले.
अमळनेर नगरपरिषद अंमळनेर शहरासाठी 24 × 7 पाणीपुरवठा सविस्तर प्रलंबित प्रकल्प प्रस्ताव मंजुरी मिळण्याबाबत 180 कोटी अंदाजीत रक्कम..,
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरुत्थान अभियान अंतर्गत अमळनेर शहरासाठी उर्वरित 70 किलोमीटर लांबीच्या भुयारी गटार प्रलंबित योजनेच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्याबाबत 140 कोटी रुपये ,
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत अंमळनेर शहर भुयारी गटारी योजना एकूण लांबी 72 किलोमीटर कामासाठी शहराची सहा विभाग मधील झालेल्या रस्त्याचे प्रिमिक्स काँक्रिटीकरण करणे 100 कोटी अंदाजीत रक्कम
अमळनेर नगरपरिषद क्षेत्रातील उपरोक्त व्यापक जनहिताच्या प्रलंबित कामाच्या प्रस्तावांना प्राधान्यने मान्यता द्यावी अशी अपेक्षा अंमळनेर तालुक्याचे माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे..

