माध्यमिक विद्यालय रणाईचे, येथे विद्यार्थी पालकांमध्ये उद्बोधन पर चर्चासत्र संपन्न
1 min read

माध्यमिक विद्यालय रणाईचे, येथे विद्यार्थी पालकांमध्ये उद्बोधन पर चर्चासत्र संपन्न

Loading

माध्यमिक विद्यालय रणाईचे, येथे विद्यार्थी पालकांमध्ये उद्बोधन पर चर्चासत्र
संपन्न

अमळनेर प्रतिनिधी
आमच्या माध्यमिक विद्यालय रणाईचे, येथे सक्षम बालविवाह निर्मूलन प्रकल्प महिला व बालविकास विभाग जळगाव युनिसेफ एसबीसी 3 व साने गुरुजी फाउंडेशन अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलन प्रकल्प हा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक मा. इन्शुलकर सर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला…
आलेल्या मान्यवरांचे विद्यार्थीनींनी स्वागतगीत म्हणून तर मा. मुख्याध्यापकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
त्या अनुषंगाने ‘विद्यार्थी सक्षमीकरण’ सत्र लिना जाधव यांनी तर पालक जागरूकता सत्र प्रशिक्षक सौ. प्रतिभा गजरे यांनी कृती युक्त सादरीकरण करून बालविवाह निर्मूलनाची गरज आपल्या कृतीयुक्त प्रबोधनातून विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि पालकांना पटवून दिली. आजही ‘बालविवाह’ ही समाजातील खूप मोठी समस्या असून, एकीकडे मुली शिकण्याचे, सुशिक्षित होण्याचे प्रमाण वाढत आहे मात्र दुसरीकडे बालवयीन मुला-मुलींची लग्ने लावून देण्याचे प्रमाण सुद्धा आपल्या अमळनेर तालुक्यात वाढत असल्याचे दिसत आहे. ही परिस्थिती बदलायची असल्यास पालकांनीच जागृत होऊन मुलीचे वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे होईपर्यंत लग्न न करण्याचा निर्धार करावा, एवढेच नाही तर अशा घटना इतरत्र कुठे घडत असल्यास त्याची माहिती तात्काळ संबंधित शासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन कार्यक्रमा वेळी त्यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. डी.डी. इन्शुलकर , संस्थेचे समन्वयक मा.श्री. पियुष शिंदे, सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी, त्यांचे पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *