शामच्या आईच्या कथा जीवनाला दिशादर्शक आहेत-एस के राणे राजपूत
1 min read

शामच्या आईच्या कथा जीवनाला दिशादर्शक आहेत-एस के राणे राजपूत

Loading

शामच्या आईच्या कथा जीवनाला दिशादर्शक आहेत.
एस के राणे राजपूत

आसोदा – साने गुरुजींनी आपल्या विद्यार्थ्यांना अध्यापनातून संस्कारक्षम करीत देश घडविण्याचेच काम केलेले असून कथेच्या माध्यमातून विद्यार्थी हा संस्कारक्षम होत असल्याचे मत सार्वजनिक विद्यालय आसोदा येथील साने गुरुजी कथा मालेत व्याख्यान देताना एस.के. राणे राजपूत यांनी व्यक्त केले. सार्वजनिक विद्यालय आसोदा येथे राबविण्यात येत असलेल्या साने गुरुजी कथामालेत बोधपर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.ते पुढे म्हणाले ,विद्यार्थ्यांनी , मुलांनी कधीच आई वडिलांना विसरु नये, त्यांचे उपकार कधीही विसरू नये असा सल्ला दिला व आई-वडिलांचे आपल्या जीवनातील महत्त्व समजावून सांगितले.सुरवातीला मंचावर उपस्थित मान्यवर  मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, सचिन जंगले, यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर हेमांगी पाटील व खुशी बिऱ्हाडे या विद्यार्थिनींनी उपस्थित विद्यार्थ्यांना बोधपर कथा सांगितली.त्यातून त्यांनी प्रामाणिकपणा आणि कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये याचा संदेश मुलांना दिला.सचिन जंगले यांनी विद्यार्थ्यांना त्यांनी ऐकलेल्या कथेतून,बोधपर मार्गदर्शनातून काहीतरी बोध घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे असे मत मांडले. सूत्रसंचालन प्रज्ञा कापडणे तर आभार संयोजक भावना महाजन चौधरी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *