आर एस पी अधिकारी प्रशिक्षणामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन, येत्या काळात वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांची संख्या १००% वाढेल: डॉ.विनय कुमार राठोड
![]()

आरएसपी अधिकारी शिक्षकांना ठाणे शहर वाहतूक पोलीस उप तर्फे प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न!
ठाणे,दि.१७ (प्रतिनिधी) पोलीस आयुक्तालय ठाणे , पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर अंतर्गत महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर आयोजित आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा रविवार दिनांक २/६/२०२४ ते सोमवार दिनांक १०/६/२०२४ दरम्यान
Brighton world school,( गुरुकृपा शिक्षणशास्त्र महाविद्यालय) गौरीपाडा, कल्याण पश्चिम येथे पार पडला.या मध्ये ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले त्यांना पोलीस आयुक्तालय ठाणे , पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर यांच्या कडुन प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम मंगळवार दिनांक १६/७/२०२४ रोजी पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर मा.डॉ.विनयकुमार राठोड यांच्या शुभहस्ते व त्याच्याच अध्यक्षतेखाली मोठया उत्साह पुर्ण वातावरणात ठाणे तीन हात नाका येथील कार्यालयात वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाहतुक शाखेचे प्रशिक्षक मार्गदर्शक श्री.विजय गायकवाड,
श्री.ज्ञानेश्वर आव्हाड,
दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा ,महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर चे प्रसिध्दी प्रमुख डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील,महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर सिव्हिल डिफेन्स चे मोटीवेशन स्पीकर डॉ.श्री. किशोर अढळकर ,श्री. दलजीत सिंग बोन्स समाजसेवक (कल्याण) माणिक पाटील समाजसेवक (डोंबिवली)आर एस पी ठाणे, नवीमुंबई विभागीय समादेशक तथा शिबिर प्रमुख श्री.दिलीप स्वामी,ठाणे,पालघर व नाशिक आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ.श्री. मनिलाल रतीलाल शिंपी, विभागीय समादेशक डॉ.श्री.अशोक गुप्ता,ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक श्री. जितेंद्र सोनवणे आदी मान्यवर व मोठ्या संख्येने आर एस पी अधिकारी वर्ग उपस्थित होते.प्रशिक्षण हा महत्त्वाचा भाग आहे.आमचे जीवन सेवेसाठी हे ब्रीदवाक्य जसे तुमचे आहे, त्याचप्रमाणे ठाणे वाहतूक शाखा व ठाणे पोलीस यांचे पण आहे. आपण सर्वजण खांद्याला खांदा लावून काम करतोय तसेच महत्त्वाचे जेवढे बंदोबस्त असतात त्या ठिकाणी मनीलाल शिंपी साहेब व दिलीप स्वामी साहेब त्यांचे संपूर्ण पाठबळ घेऊन आमच्या सोबत काम करतात. हे प्रशिक्षण घेण्यासाठी ही या दोघांनी खूप दिवसापासून त्यांचा तगादा लावला होता त्यांची जी काही मेहनत होती आणि त्यांचा जो काही वारंवार भेटण्याचा मनसुबा होता त्याचेच फलित या प्रशिक्षण वर्गांतुन पूर्ण केले आहे. सदर प्रशिक्षण वर्ग हा यशस्वीपणे पार पाडला त्यामध्ये आमचे अधिकारी व कर्मचारी देखील सहभागी झाले होते. यामागचा उद्देश एकच आहे. मात्र वाहतूक विभागामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी उणीव आहे ती सांगायला हवी आहे, ठाणे पोलीस यांची मुंबई पोलिसांशी तुलना होते, त्यांच्यामध्ये चुरस होते मला सांगायला कोणतीच अडचण नाही आहे, त्यांचे जे संख्याबळ आहे ते खूप मोठे आहे, मात्र ठाण्यामध्ये सहा ते साडेसहाशे अधिकारी कर्मचारी वर्ग आहे तर या उलट मुंबईमध्ये जवळजवळ साडेतीन हजार अधिकारी कर्मचारी वर्ग आहेत त्यामुळे ठाण्याच्या पाचपटीने जास्त कर्मचारी मुंबईला आहेत, व दोन्ही पोलीस स्टेशनचा परिसर पाहिला तर अवघ्या दहा टक्के एवढा फरक जाणवेल, आपल्या ठाण्यात मोठ्या गाड्यांचे प्रमाण जास्त आहे आपला शहर विस्कटलेला आहे आपले रस्ते व त्या रस्त्यांचा दर्जा एकदम खालावलेला आहे, आपल्या लोकांची वाहतूक नियमांची पालन करण्याची संख्या फार कमी प्रमाणात आहे, त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की असे प्रशिक्षण वर्ग आपण निरंतर चालू ठेवून जनजागृती केली पाहिजे, आज तुम्हाला वर्दी मिळाली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, वर्दी प्रत्येकाच्या नशिबात नसते तुम्हाला ती कर्तुत्वाने मिळाली आहे, त्यामुळे वर्दीचा मान राखा, सन्मान करा, आज वर्दी मुळे तुमची जबाबदारी वाढली आहे, तुम्ही मोटरसायकल व वाहन चालवताना जर हेल्मेट व सिट बेल्ट लावला नाही तर तुमचा मुलगा देखील तुम्हाला शहाणपण शिकवायला कमी पडणार नाही, जी गोष्ट तुम्ही लोकांना शिकवता ती स्वतः पालन करणे देखील महत्त्वाचे आहे, व स्वतःपासून अंमलबजावणी करण्यास तुम्ही सुरुवात करावी त्याचबरोबर तुमच्या कुटुंबीयांना व सगे सोयऱ्यांना देखील याबाबतची माहिती द्यावी, तसेच मोटर सायकल चालवताना समोर च्यांनी हेल्मेट घातला असला तरी मागे बसलेल्याला देखील हेल्मेट घालावे,
आज देशामध्ये मिनिटाला आठशे लोक मरतात, अपघाताच्या मृत्यूमध्ये शासन सोडलं किंवा त्यांची यंत्रणा सोडली तर कोणीही लक्ष देत नाही व यासाठी नागरिक जागृत नाहीत ते याबाबत सिरीयस घेत नाहीत म्हणून आता तुमचा रोल महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, तुम्ही सर्वांनी शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना व्यवस्थित प्रशिक्षण दिले तर येणाऱ्या काळात वाहतुक नियम पालन करणाऱ्यांची संख्या शंभर टक्के वाढेल असे अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ.विनय कुमार राठोड यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर एस पी ठाणे ,नवी मुंबई समादेशक श्री.दिलीप स्वामी यांनी केले.तसेच सूत्रसंचालन श्री.विनोद शेळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन आर एस पी कमांडर डॉ.श्री. मनिलाल शिंपी यांनी केले.
हे प्रशिक्षण शिबिर यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी मोलाचे सहकार्य करणारे ठाणे वाहतूक शाखेचे मेजर श्री.चाबुकसर यांचे विशेष आभार आर एस पी कमांडर डॉ.श्री.मनिलाल शिंपी यांनी मानले,सदर संपुर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिबिर प्रमुख श्री.दिलीप स्वामी,आर एस पी कमांडर डॉ.श्री.मनिलाल शिंपी,ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक श्री.जितेंद्र सोनवणे,संतोष हंडाळ, श्री.बाळा साठे, विवेक ताम्हणकर, संजय खैरनार,संतोष औटी, व सर्व आर एस पी अधिकारी शिक्षक बंधू भगिनींसह संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली.ओमप्रकाश धनविजय यांनी स्वागत गीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंलन आर्टिस्ट विनोद शेलकर यांनी केले.

