भडणे पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या मदतीने पुराच्या पाण्यातून दोन युवकाचे वाचवीले जीव
1 min read

भडणे पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या मदतीने पुराच्या पाण्यातून दोन युवकाचे वाचवीले जीव

Loading

भडणे पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या मदतीने पुराच्या पाण्यातून दोन
युवकाचे वाचवीले जीव

शिदखेडा तालुक्यातील भडणे येथे आज सायंकाळी आठ वाजता सुमारे एक तास जोरदार पाऊस झाल्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने भडणे येथील नदीत शिंदखेडा येथून विखरण, येथील शेतकरी यांची युरियाची व खताची पिक अप गाडी खत घेऊन जाताना भडणे गावातील नदीत पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत गाडी पलटी झाल्याने गाडीत ड्रायव्हर तुषार पाटील व प्रदीप पाटील यांनी आरडाओरड केली मात्र पाउस चालु असल्याने नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे गाडीत अडकलेल्या दोन्ही युवकांनी लोकांना मदतीसाठी आरडाओरड मारली केली नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे नदी शेजारी लोकांना पोलीस पाटील युवराज माळी याना या घटनेची माहिती फोन करून सांगितले पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता गावातील युवक व ग्रामस्थांच्या मदतीने गल्लीतील लोकांना मदतीसाठी आरडाओरड केली व गावातील युवकांनी दोर सोबत घेऊन या दोन्ही युवकांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले यावेळी पोलीस पाटील युवराज माळी रामराव पाटील विठोबा माळी भुलेश्वर साळुंखे भिकन सोनवणे प्राध्यापक मनोज निकम गुलाब पाटील सचिन अहिरे पवन निकम वसंतराव पाटील आधी युवकांनी शथीचे प्रयत्न करून एकमेकांच्या साह्याने नदीत दोर बांधून उतरून दोघे युवकांना वाचविण्यात यश मिळाले व बाहेर सुखरूप काढण्यात आले या घटनेची माहिती भडणे तील पोलीस पाटील युवराज माळी यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील तलाठी रुपेश कोळी यांना सदर घटनेची माहिती दिली दोघे युवकाचे प्राण वाचले ल्यामुळे युवकांनी आपले अश्रू अनावर झाले युवकांच्या व पोलीस पाटलांच्या सतर्कतेमुळे दोघे युवकांचे प्राण वाचल्यामुळे दोघे युवकांनी ग्रामस्थांना मिठी मारून आपल्या अश्रू अनावर झाले
चौकट
भडणे, ग्रामस्थ व पोलीस पाटील यांनी आपला जीव धोक्यात घालून पोहता येत नसताना देखील समय सुचकता दाखवून आम्हाला पुराच्या पाण्यातून बाहेर काढून नविन जन्माला आलो
तुषार पाटील,प्रदिप पाटील
विखरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *