विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनावर भर द्या-किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे यांच पदाधिकाऱ्यांना आवाहन
![]()
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
पक्ष संघटनावर भर द्या
किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे यांच पदाधिकाऱ्यांना आवाहन
अमळनेर भाजपा तालुका व शहर पदाधिकारी यांची बैठक संपन्न
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच अमळनेर तालुका भाजप पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा संपन्न झाली..
भारतीय जनता पक्षाचे नेते श्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , ग्रामविकासमंत्री श्री गिरीश महाजन, विजय चौधरी, रवीजी अनासपुरे , खासदार स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनाने आज अमळनेर भाजपा तालुका व शहर पदाधिकारी मंडळाची बैठक जिल्हाध्यक्ष हभप जळकेकर महाराज पाटील यांच्या अध्यक्षेखाली पार पडली.. त्यात प्रमुख वक्ते किसान मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे , जिल्हा सरचिटणीस सचिनजी पानपाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती भिकेश पाटील, पंचायत राज प्रदेश संयोजक ॲड. व्हि.आर पाटील, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष विजयजी राजपूत, सरचिटणीस महेंद्र पाटील सर, कैलास पाटील ,राकेश पाटील, दिलीप साळी, शहर उपाध्यक्ष चंद्रकांत कंखरे सर,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विलास पाटील सर, हिरालाल पाटील व युवा मोर्चा शहराध्यक्ष देवा लांडगे,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली व पक्ष संघटनावर भर देण्यात यावा. महाराष्ट्रात 288 महायुतीच्या जागा लढवल्या जाणार आहेत.. ज्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार असेल त्याच्या मागे भक्कमपणे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उभे राहावे असे सांगण्यात आले.. अर्थसंकल्प वर चर्चा करण्यात आली. अमळनेर येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्या समस्या जिल्हा व विभागिय पदाधिकारी यांनी समजून घेतल्या.
..यावेळी प्रस्ताविक तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील , पक्षाचाआढावा सचिनजी पानपाटील , मुख्य वक्ते पोपटतात्या भोळे व अध्यक्षीय भाषण जिल्हाध्यक्ष ह भ प जळकेकर जी महाराज यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महेंद्र पाटील सर यांनी केले..


