म्युनिसिपल हायस्कूल भुसावल ने शिक्षक आपल्या दारी राबविला उपक्रम
![]()
म्युनिसिपल हायस्कूल ने शिक्षक आपल्या दारी राबविला उपक्रम
भुसावळ :- नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ ने शिक्षक आपल्या दारी हा उपक्रम राबविला. शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भानखेडा , व तिघ्रा येथे जाऊन विद्यार्थी व पालकांच्या सदिच्या भेटी घेतल्या. व शाळेत येण्या जाण्यासाठी पालकांना त्यांचा कामाचा रोज वाया घालावा लागतो शाळेत येण्यासाठी खर्च करावा लागतो त्या साठी व सर्व पालक विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांच्याच गावी जाऊन शिक्षक पालक सभा घेतली. त्यावेळी मुख्याध्यापक श्री एस. जी. मेढे, जेष्ठ शिक्षिका श्रीमती सरला सावकारे, शिक्षक श्री. पी. आर साखरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्री एस. जी. मेढे यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांबरोबर पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे असे सांगितले व शासना कडून आदीवासी विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या सवलती बद्दल व आदिवासी लोकांना मिळत असलेल्या सवलती बद्दल सखोल माहिती दिली व मुलांना शाळेत नियमित पाठविणे का आवश्यक आहे त्या बद्दल मार्गदर्शन केले. जेष्ठ शिक्षिका श्रीमती सरला सावकारे यांनी मुलींना शिक्षण देणे काळाची किती गरज आहे हे सांगितले एक शिकलेली स्त्री घराचा उद्धार करू शकते असे त्या त्यावेळी म्हणाल्या. जेष्ठ शिक्षक डॉ. पी आर. साखरे हे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आज शिक्षण फक्त केवळ पोट भरण्यासाठी साठी घ्यावयाचे नसून आपला व समाजाचा व आपल्या परिवाराचा विकास करण्यासाठी घ्यावयाचे आहे म्हणून सर्व माता भगिनींनी त्यांच्या मुला, मुलींना दररोज शाळेकडून मिळालेल्या गणवेशात शाळेत पाठविणे आवश्यक आहे. सर्व शिक्षकांनी स्वखर्चातून सर्व विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी गाडी लावलेली आहे त्या गाडीचा उपयोग आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करून शिक्षण घ्यावे. असे सांगितले या प्रसंगी आदिवासी एकता परिषदेचे,समाज व गाव अध्यक्ष श्री धोंडीराम लक्ष्मण पवार, शिक्षक श्री. एस. टी चौधरी, नाना पाटील, मनोज किरंगे, प्रविण चौधरी,शिक्षिका श्रीमती शालिनी बनसोडे संध्या धांडे, ज्योती शिरतुरे, रेखा सोनवणे, तसेच सर्व पालक, विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.*

