आबांच्या गोष्टी, समिक्षण सर्व प्रथम आबांच्या गोष्टी या आपल्या नावाजलेल्या नाव लौकीक मिळालेल्या पुस्तकास साहित्य अकादमी पुरस्कार मिळणे ही फारच अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यासाठी आपणास भरभरून शुभेच्छा, अभिनंदन..!
1 min read

आबांच्या गोष्टी, समिक्षण सर्व प्रथम आबांच्या गोष्टी या आपल्या नावाजलेल्या नाव लौकीक मिळालेल्या पुस्तकास साहित्य अकादमी पुरस्कार मिळणे ही फारच अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यासाठी आपणास भरभरून शुभेच्छा, अभिनंदन..!

Loading

आबांच्या गोष्टी,
समिक्षण
सर्व प्रथम आबांच्या गोष्टी या आपल्या नावाजलेल्या नाव लौकीक मिळालेल्या पुस्तकास साहित्य अकादमी पुरस्कार मिळणे ही फारच अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यासाठी आपणास भरभरून शुभेच्छा, अभिनंदन..!

*आबांच्या गोष्टी कथासंग्रह*
एकूण 17 कथा.
प्रकाशन- दिलीपराज प्रकाशन पुणे.
आकर्षक मुखपृष्ठ – सरदार जाधव.
पृष्ठे – 104
मुल्य-130/- रू.
लेखक – आबा गोविंदा महाजन

आपले पुस्तक वाचून झाले आहे. अगदी साधी सोपी भाषा आपल्या लेखणीतून उतरलेली आहे. टोपण नाव यात सोप्या भाषेत आत्याने केलेला शाळेत जाण्याचा हट्ट आणि काळजी फारच सुंदर आहे. यातून टोपन नावाची छान स्पष्टीकरण दिले आहे.
गफूरभाई चा प्रमाणिकपणा छानच आहे. त्यातून मुलांना प्रामाणिकपणे वागण्याचे स्पष्ट मार्गदर्शन होते.
आपल्या लेखणीतून नयना च्या संवेदनशील प्रसंगातून धाडसी निर्णय घेऊन नयनदान करून. आदर्श समाजासमोर ठेवला आहे. खऱ्याखुऱ्या परिस्थितीचा सामना येथे आहे. अंगावर काटा उभा रहावा असा भावनिक प्रसंग सहजरीत्या मांडलेला आहे.
शाळेतले दिवस आणि धोंडी धोंडी पाणी दे ही‌ निसर्ग किमया. सुखदुःखांचा सामना यात आहे. लाखोंचा सलाम,बोकयकाला,मनकरणाबाईचा नातू, अनेक छान छान गोष्टी स्वतः वर आधारीत.. बिंबवल्या आहेत.
मॅट्रिक म्हणजे सगळ्यांची परीक्षा . जीवनातील पहीलं यशाचं शिखर..पेपरात फोटो. मुलांना खरोखर प्रेरणादायी आहे.
मला‌ शिकायचंय यात मुलीच्या शिक्षणासाठी आई वडीलांची तळमळ उल्हसित करणारी आहे.
बोलक्या वर्गातून आनंद छटाच जणू उमटलेली आहे. एका शिक्षकाच्या नोकरीतून अधिकारी किती मोठं स्वप्न आपण पुर्ण केले. यातून मूलं घडतील..
चोराचीही गंमत आपण सांगूनच टाकलीय.
कचेरी, दिनूची कमाल, एकमेकांना कशी मदत केली पाहिजे. यातून एकोपा दिसून येतो.
रानीवनी जाऊन गुरेढोरे चारून आपण पुस्तक वाचू शकतो. शिक्षणाला मान असतो.
सर्व धर्म समभाव राम रहीम दोस्ती आणि पार्टनर एकमेकांना मदतीचा हात..
आबांची गोष्ट या पुस्तकात जिवंतपणा जाणवला. खान्देशी शब्द, सोपी भाषा करून जसे हृदयावर कोरलेले वाक्यं आहेत.
आपल्या उल्लेखनीय आणि सन्मानाच्या साहित्य प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव करतो.
समिक्षण.
– रविंद्र भास्कर सोनवणे
– धानोरा ता.चोपडा. जि.जळगाव.
– 9689399979

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *