समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि अन्य समस्याबाबत आयुक्तांना निवेदन
1 min read

समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि अन्य समस्याबाबत आयुक्तांना निवेदन

Loading

समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि अन्य समस्याबाबत आयुक्तांना निवेदन 

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा आणि अमळनेर या तीन ठिकाणी समाजकार्य महाविद्यालय आहे. या तीनही विद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून म्हणजे माहे एप्रिल, मे आणि जून या महिन्यांचे वेतन अद्याप येतो मिळालेले नाही. तीन महिने झाले तरी वेतन नसल्यामुळे समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचारी वर्ग अत्यंत हवालदिल झाला आहे. या संदर्भात समाजकार्याच्या राज्यस्तरावर कार्यरत असणारी मास्वे संघटना, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरीय मागासवर्गीय प्राध्यापक संघटना, एन्. मुक्टो प्राध्यापक संघटना, समाजकार्य महाविद्यालय, चोपडा इ. विविध संघटनांच्या वतीने समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आणि चर्चा करण्यात आली.
गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त असलेली समाजकार्य महाविद्यालय आता राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबतचा अध्यादेश शासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आलेला आहे. पण ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून होणे अपेक्षित आहे. पण अद्यापपावेतो ते झालेले नाही. तसेच कर्मचाऱ्यांच्या फरकाची रक्कम, डी सी पी एस अंतर्गत एकूण जमा झालेली रक्कम, गेल्या दोन वर्षाच्या कालावधी निधन झालेल्या कर्मचाऱ्यांची रक्कम आणि इतर अन्य प्रश्नांचा निवेदनात समावेश करण्यात आला आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि विविध संघटनांचे प्राध्यापक प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी सांगितले की, शासनाच्या ई कुबेर प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनास उशीर झाला असून लवकरच ही अडचण दूर केली जाऊन कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यात येईल. कर्मचाऱ्यांच्या अन्य समस्या संदर्भात कामकाज वेगात सुरू असून लवकरच सकारात्मक कार्यवाही केली जाईल असे देखील त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यापीठातील सिनेट सदस्य तथा मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष प्रा.डॉ.जयवंत मगर, मास्वे संघटनेचे प्रा.डॉ.उमेश वाणी, प्रा.डॉ.श्याम सोनवणे, केंद्रीय सचिव प्रा.डॉ.अनिल हिवाळे, प्रा.डॉ.राहुल निकम, प्रा.डॉ.मारोती गायकवाड, प्रा.डॉ.नितीन बडगुजर, प्रा.डॉ.निलेश चौधरी, प्रा.डॉ. अनंत देशमुख,प्रा.डॉ. विनोद रायपुरे, प्रा.डॉ.योगेश महाजन, प्रा. डॉ. दिपक महाजन, प्रा.डॉ. वाय.जी.महाजन, प्रा.डॉ.भरत खंडागळे,प्रा.डॉ.अशोक हनवते, प्रा डॉ.मोहिनी उपासनी, प्रा.डॉ. अस्मिता सरवैय्या, कार्यालय अधीक्षक सोमनाथ बारी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत. समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर लवकर तोडगा न निघाल्यास सनदशीर संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *