मारवड पोलीस स्टेशन मध्ये कायद्याविषयी भरली शाळा..
![]()
मारवड पोलीस स्टेशन मध्ये कायद्याविषयी भरली शाळा..
अमळनेर प्रतिनिधी
मारवड पोलीस स्टेशन येथे नवीन तीन कायद्या भारतीय न्याय संहिता-2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम -2023 संदर्भात चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.सदर चर्चा सत्रात मारवड पो स्टे हद्दीतील शाळा चे शिक्षक, पोलीस पाटील,पत्रकार, विद्यार्थी ई हजर होते सदर चर्चा सत्रात विधी अधिकारी,SDPO कार्यालय अमळनेर चे ॲड. संदीप बोरसे, तसेच ॲड संभाजी पाटील अमळनेर न्यायालय, स पो नि शितलकुमार नाईक यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास पो उप निरिक्षक विनोद पाटील, राजेंद्र पाटील,पो हवालदार सुनील तेली, मुकेश साळुंखे, संजय पाटील, सचिन निकम, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र पाटील, तुषार वाघ इ. हजर होते

