सभेत अनुसूचित जाती प्रवर्गातील आनंदकुमार चंद्रभान जाधव यांची यावल माध्यमिक पतपेढीच्या निवडणुकीतून जाहीर माघार तर आतिक मेघे यांना पाठिंबा
1 min read

सभेत अनुसूचित जाती प्रवर्गातील आनंदकुमार चंद्रभान जाधव यांची यावल माध्यमिक पतपेढीच्या निवडणुकीतून जाहीर माघार तर आतिक मेघे यांना पाठिंबा

Loading

प्रोटान संघटनेची तालुकास्तरीय सभा संपन्न
——————————
सभेत अनुसूचित जाती प्रवर्गातील आनंदकुमार चंद्रभान जाधव यांची यावल माध्यमिक पतपेढीच्या निवडणुकीतून जाहीर माघार तर आतिक मेघे यांना पाठिंबा
———————————-
यावल:-दिनांक 29 जून 2024 या दिवशी यावल शहरातील जिनिंग प्रेस येथे प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना (प्रोटान) या संघटनेची यावल तालुका कार्यकारणीची मासिक सभा घेण्यात आली या सभेत माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढी यावल ची निवडणूक प्रक्रिया ७ जुलै 2024 रोज रोज रविवार यादिवशी होणार आहे. 26 जून 2024 या दिवशी या निवडणुकीतून माघार घेण्याची अंतिम तारीख होती. परंतु जळगाव पतपेढीच्या एका संचालकाने हस्तक्षेप करून त्याच्या मर्जीतील त्याच्या मित्रमंडळीतील नात्यातील काही लोकांना बिनविरोध निवडून आणण्याकरिता प्रयत्न केला त्यामुळे अनुसूचित जाती व भालोद न्हावी सर्वसाधारण गटात मात्र वाद निर्माण झाला व दोघेही उमेदवारांनी माघार घेतली नाही.
परंतु 29 जून 2024 या दिवशी यावल शहरात जिनिंग प्रेस येथे प्रोटान संघटनेची सभा प्रोटान महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा लेखक व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील प्रखर वक्ते गणेश काकडे यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली. त्या ठिकाणी अनुसूचित जातीतील उमेदवार आनंदकुमार चंद्रभान जाधव फेजपूर व आतिश मेघे वड्री यांना दोघांना बोलवून यांच्यात समन्वय घडवून आणण्यात आला त्या सभेत आनंदकुमार चंद्रभान जाधव यांनी स्वतःहून पुढे येत अनुसूचित जाती या प्रवर्गातून जाहीरपणे माघार घेत आतिश मेघे यांना समर्थन दिले. तसेच यावल शहर या गटातून प्रोटान संघटनेचे तालुका कार्यकारणीतील सदस्य व साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक नितीन बारी हे बिनविरोध झाले आहेत प्रोटॉन संघटनेच्या मध्यस्थीने व त्यांच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने सतीश चौधरी सांगवी राजू चौधरी फैजपूर दीपक अण्णा मनवेल असे तीन उमेदवार बिनविरोध झालेले आहे. प्रोटॉन संघटनेच्या सहकार्याने एकूण ५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत अशी कबुली तालुका कार्यकारिणीच्या सभेत खुद्द उमेदवारांनीच दिली आहे. यावल तालुक्यात प्रोटॉन संघटनेने त्यांच्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. तालुका कार्यकारणी सभेत नवनिर्वाचित संचालकांचे जळगाव पतपेढीचे माजी उपाध्यक्ष पी एस सोनवणे सर व विद्यमान संचालक अजय कुमार पाटील तसेच पी डी भालेराव बि डी सुरवाडे महेंद्र तायडे हर्षद पठाण आतिक मलिक गजानन सुरवाडे आनंदकुमार जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सभेला यावल तालुक्यातील उमेश लासुरे राजू सोनवणे संजय तडवी राजू तडवी चंदनकर रवींद्र निंभोरे साहेबराव सपकाळे परलाद पाटील यांनी झांबरे यास चौधरी अहमद खान यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते या मीटिंग चे संचालन प्रोटॉन संघटनेचे कार्याध्यक्ष मनोज तायडे यांनी केले तर मीटिंगची नियोजन पी एस सोनवणे यांच्या माध्यमातून झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *