स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे उड्डाणपूल ऐवजी रेल्वे भुयारी बोगदा-मा.आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील
1 min read

स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे उड्डाणपूल ऐवजी रेल्वे भुयारी बोगदा-मा.आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील

Loading

स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे उड्डाणपूल ऐवजी रेल्वे भुयारी बोगदा-मा.आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील

पावसामुळे बोगद्यामध्ये पाणी साचत असल्यामुळे वाहनधारकांना होतोय नाहक त्रास

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्याकडे विकास कामांची दूरदृष्टी होती..
अमळनेर तालुक्यामध्ये त्यांनी केलेली ठोस कामे आजही जशीच्या तशी चांगल्या स्थितीत आहेत.. त्यांनी मंजूर केलेली कामे याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्यामुळे आणि पावसाळ्यात जनतेला नाहक त्रास होतांना दिसत आहे
तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पत्र दिनांक 13 आँगस्ट 2014 अन्वये 2014 15 साठी महाराष्ट्रातील 709 कामांसाठी अंदाजित रुपये किंमत 623 कोटीचा प्रस्ताव नितीन गडकरी मंत्री दळणवळण व महामार्ग भारत सरकार नवी दिल्ली यांच्याकडे अमळनेर तालुक्याचे माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील यांनी मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता तर नंतर नितीन गडकरी दळणवळण मंत्री यांच्याकडे पत्र मुख्यमंत्री चव्हाण मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे 709 कामांसाठी 623 कोटी रुपयांच्या कामांना तत्त्वतः मान्यता दिलेली होती.. त्यातील 709 कामांपैकी माननीय आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील यांच्या लेखी मागणीनुसार दोन कामांचा समावेश होता
धरणगाव टाकरखेडा अमळनेर शिंदखेडा राज्यमार्ग सहा किलोमीटर 30/ 200 रेल्वे उड्डाणपूलांचे बांधकाम करणे 30 कोटी रुपये
धरणगाव राजवट पारोळा राष्ट्रीय महामार्ग 39 किलोमीटर 1/400 मध्ये रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम करणे 33 कोटी 34 लाख 38 हजार रुपये मंजूर करण्यात आले होते..
स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्ष झाल्यामुळे वरील दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल ऐवजी रेल्वे भुयारी बोगदा तयार करण्यात आलेला आहे.. सध्या परिस्थितीत पावसामुळे त्या बोगद्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे प्रवाशांना व वाहनधारकांना त्रास होत असून किरकोळ अपघात होत आहेत या बोगद्यांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीनीं लक्ष घालून रेल्वे प्रशासनाकडून पाणी निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आदेशित करावे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *