मनमानी करणाऱ्या संस्थेवर प्रशासक नेमायला हवे – गुलाबराव पाटील
1 min read

मनमानी करणाऱ्या संस्थेवर प्रशासक नेमायला हवे – गुलाबराव पाटील

Loading

मनमानी करणाऱ्या संस्थेवर प्रशासक नेमायला हवे- गुलाबराव पाटील

प्राध्यापकांच्या आंदोलनाला शिक्षक परिषदेचा पाठिंबा.

*ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी* – डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के. व्ही. पेंढारकर अनुदानित कॉलेज बंद करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.या मनमानी निर्णयाविरोधात कॉलेजचे प्राध्यापक इतर कर्मचाऱ्यांसह माजी विद्यार्थी साखळी उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन करीत आहेत .महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कोकण विभाग अध्यक्ष गुलाबराव पाटील ,आणि त्यांचे सहकारी उपाध्यक्ष हेमलता मुनोत,कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष अरुण निळे, कार्यवाह सुहास गायकवाड, आणि राज्य कार्यकारणी सदस्य गजानन भोसले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन परिषदेचा जाहीर पाठिंबा दिला.व साखळी उपोषणात सहभागी झाले.अनुदानित कॉलेज बंद करून अनुदानावर असलेल्या प्राध्यापकांचे व इतर कर्मकाऱ्यांचे वेतन बंद करत दुसऱ्या कॉलेजमध्ये समायोजन करण्याचा प्रयत्न नियमबाह्य आहे. कॉलेज विनाअनुदानित करून विद्यार्थी पालकांकडून आपल्या मर्जी नुसार शुल्क आकारून संस्था प्रवेश देईल यामुळे गोरगरीब विद्यार्थी पालकांवर अन्याय होणार. शासनाच्या नियमांचे पालन न करणे संस्थेची मनमानी आहे .ही मनमानी कुठेतरी थांबवायला हवी. म्हणून संस्थेवर प्रशासक नेमून कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी पालकांना न्याय मिळायला पाहिजे असे कोकण विभाग अध्यक्ष गुलाबराव पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *