राजश्री शाहू महाराज आरक्षणाचे आधारस्तंभच के. बी. तायडे
1 min read

राजश्री शाहू महाराज आरक्षणाचे आधारस्तंभच के. बी. तायडे

Loading

राजश्री शाहू महाराज आरक्षणाचे आधारस्तंभच
के. बी. तायडे
छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानांमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या प्रजेला सुखी आणि संपन्न, सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने दूरदृष्टी ठेवत समान वागणूक देत अस्पृश्यांना दिलेले आरक्षण त्यांच्यातला स्वाभिमान जागृत करत नवा इतिहास त्या काळात छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी घडवला आणि यामुळेच ते खऱ्या अर्थाने आरक्षणाचे आधारस्तंभ होते असे विचार सार्वजनिक विद्यालय आसोदा येथील सांस्कृतिक विभाग प्रमुख के.बी. तायडे यांनी सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल. जे .पाटील, ज्येष्ठ शिक्षिका मंगला नारखेडे विचार मंचावर उपस्थित होत्या याप्रसंगी डॉ. मिलिंद बागुल यांनी राजश्री शाहू महाराज यांचा राज्यकारभार ही भारतीय संविधानाला आदर्श असाच आहे राजश्री शाहू महाराज आपल्या प्रजेसाठी आदर्श असे राजे होते रयतेचे राजे होते आणि म्हणूनच त्यांच्या दूरदृष्टीला अनुसरून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या गोरगरीब वंचित समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले दिसून येतात. सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून राजश्री शाहू महाराज यांनी आपल्याला समृद्ध लोकशाहीची वाट त्या काळात निर्माण करून दिली असल्याचे मत देखील त्यांनी मांडले. याप्रसंगी पर्यवेक्षक एल.जे.पाटील, सानिया चौधरी यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल.जे.भुगवड्या तर आभार प्राची जेऊळकर यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *