आषाढीसाठी ताप्ती सेक्शनवरुन पंढरपूर रेल्वे सुरू करा; धरणगाव प्रवासी मंडळातर्फे निवेदन
1 min read

आषाढीसाठी ताप्ती सेक्शनवरुन पंढरपूर रेल्वे सुरू करा; धरणगाव प्रवासी मंडळातर्फे निवेदन

Loading

आषाढीसाठी ताप्ती सेक्शनवरुन पंढरपूर रेल्वे सुरू करा; धरणगाव प्रवासी मंडळातर्फे निवेदन

धरणगाव प्रतिनिधी –

धरणगाव : महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाच्या भेटीकरिता
आषाढीसाठी पंढरपूरला जाणारे असंख्य वारकरी असतात. वारकऱ्यांच्या सोयीसाठी पंढरपूरकरिता परिवहन मंडळातर्फे शेकडो बसेसची व्यवस्था केली जाते. त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासन देखील नागपूर, खामगाव, नांदेड, जालना, संभाजीनगर अश्या इतर ठिकाणाहून आषाढीसाठी पंढरपूरला विशेष रेल्वे चालविली जाते. रेल्वेचा प्रवास वारकऱ्यांसाठी सुखकर प्रवास असतो. मात्र ताप्ती सेक्शन वरून पंढरपूर जाण्यासाठी आजतागायत एकही रेल्वे सुरु केलेली नाही. याबाबतीत ताप्ती सेक्शन वरून पंढरपूरला जाण्या-येण्यासाठी विशेष रेल्वेची सोय करावी यामागणीचे निवेदन धरणगाव प्रवासी मंडळातर्फे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, खासदार स्मिताताई वाघ, जनरल मॅनेजर कार्यालय चर्चगेट, डीआरएम कार्यालय मुंबई सेंट्रल यांच्याकडे उधना-पंढरपूर ट्रेन व्हाया नंदुरबार, अमळनेर, धरणगाव, जळगाव, मनमाड, दौंड मार्गे १ जुलै ते २७ जुलै २०२४ पावेतो सुरु करण्यात यावी. संदर्भात पत्राद्वारे मागणी केली आहे. निवेदनपत्रात प्रवासी मंडळाचे तालुकाध्यक्ष महेंद्र कोठारी, एस डब्ल्यू पाटील, रविंद्र भागवत, आनंद बाचपाई, किरण वाणी, डॉ. मिलिंद डहाळे, ललित येवले, हितेश पटेल, सुनिल चौधरी, किरणसिंह परिहार, सुशील कोठारी, संतोष सोनवणे यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *