कॅन्सरग्रस्त वडिलांचे अति दक्षता विभागात उपचार सुरू असतांनाही सर्पमित्र संजय वानखेडे यांनी सर्प जीव वाचवण्यासाठी घेतली धाव
![]()
कॅन्सरग्रस्त वडिलांचे अति दक्षता विभागात उपचार सुरू असतांनाही
सर्पमित्र संजय वानखेडे यांनी सर्प जीव वाचवण्यासाठी घेतली धाव
नंदुरबार- आपले वडील कॅन्सरग्रस्त नाना दीना वानखेडे हे स्मित हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ स्थितीत उपचार घेत असताना सुद्धा त्यांच्या शुषुश्रेसाठी त्यांच्या जवळ थांबलेले त्यांचे सुपुत्र संजय वानखेडे यांना सिटी पार्क येथील महेश पवार साहेब ह्यांच्या घराजवळ सर्प असल्याचा भ्रमणध्वनी वरून संदेश जातो आणि आपल्या दुचाकीने सर्प मित्र घटनास्थळी धाव घेऊन सर्पाचा ताबा घेतो ही घटनाच मुळी सर्पमित्र संजय ह्यांची सर्पजीवांविषयी निष्ठेची मित्रत्वाची खरी पावती होय.
ह्याबाबतचे अधिकृत वृत्त असे की घटनास्थळी धाव घेत कर्तव्यावर आलेला सर्पमित्र संजय वानखेडे हा वन्यजीव प्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था नंदुरबार च्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत कोब्रा, मण्यार,घोणस अश्या विषारी व बिनविषारी सर्पांसह सुमारे पाच ते सहा हजार सर्पांना जीवदान दिले आहे व 20 ते 25 तरुणांना सर्प पकडण्याचे प्रशिक्षणही दिले आहे ते स्वतः पदवीधर असून पातोंडे येथे सायबर चालवितात.
आज पकडलेल्या या सर्पाविषयी सर्पमित्राने सांगितले की,हा सर्प नानेटी म्हणून ओळखला जाणारा बिनविषारी आहे. ह्याचा रंग अतिशय सुंदर पिन कलर असतो.आदिवासी भगिनींच्या हातात कडे पॅटर्न प्रमाणे त्याची डिझाईन असते.हा फक्त पावसाळ्यात आढळून येतो.एकाच वेळी हे डझन भर सर्प एकाच जागेवर एकत्रही आढळून येतात .जेष्ठ,तरुण,बालगोपालांसह सर्वांना यावेळी त्यांनी हा सर्प हाताळायला दिला व आवाहन केले की सर्प दिसला म्हणजे त्याला मारू नका अथवा थेट हाताळूही नका ताबडतोब सर्पमित्रांना बोलवा.सर्प डूख धरतो या अंधश्रद्धावर विश्वास ठेवू नका.सर्प खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मित्र असल्याचे त्यांनी नमूद केले.वडील अतिदक्षता विभागात उपचार घेत असतांनाही सर्पाला जीवदान देण्यासाठी धावत येणाऱ्या “जीवदानी” सर्पमित्र संजय वानखेडे ह्यांच्या सर्पनिष्ठेचे उपस्थितांनी कौतुक केले..

