1 min read

पेंढारकर कॉलेज चा मनमानी करणाऱ्या संस्थापकावर फौजदारी गुन्हा दाखल करावा: डोंबिवली प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र पुनर्वसन समितीची मागणी.

Loading

पेंढारकर कॉलेज चा मनमानी करणाऱ्या संस्थापकावर फौजदारी गुन्हा दाखल करावा: डोंबिवली प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र पुनर्वसन समितीची मागणी.
ठाणे: कल्याण( प्रतिनिधी)डोंबिवलीतील आरएसएसचे प्रभाकर देसाई यांची मनमानी !
प्रभाकर देसाई यांनी पैशांच्या हव्यासापोटी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ संचालित के.व्ही. पेंढारकर काँलेजचे शासकीय अनुदान बंद करून विनाअनुदानीत पद्धतीने काँलेज चालविण्याचे कटकारस्थान सुरू केले आहे. यासाठी…
प्रभाकर देसाई यांनी काँलेजच्या परमनंट शिक्षकांना एका खोलीत डांबून ठेवून, त्यांचे शिक्षणाचे काम बंद केले आहे व त्यांच्यावर प्रचंड अन्याय सुरू केले आहेत.
खरेतर काँलेजची जमीन व काँलेज ही सार्वजनिक मालमत्ता आहे. ही प्रभाकर देसाईंच्या बापाची वैयक्तिक मालमत्ता नाही.
सदर जमीन खंबाळपाडा, चोळे, आजदे- गोळवली गावातील भूमिपुत्राची वडिलोपार्जित जमीन असून ती शासनाने परिसरातील जनतेला रोजगार निर्मितीच्या उद्देशाने एमआयडीसी करीता संपादित केली आहे. यामुळे हजारो भूमिपुत्र भूमिहीन होवून त्यांचे जीवन उध्वस्त झाले आहे.
सदर जमीन शासनाने डोंबिवली परिसरातील जनतेच्या शैक्षणिक उपयोगासाठी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला अटीशर्ती घालून सार्वजनिक हितासाठी नाममात्र मोबदल्याने भाडेतत्त्वावर दिलेली आहे. या जमीनीचा खाजगी वापर करता येणार नाही. परंतु प्रभाकर देसाई हे मनमानी करून या काँलेजचे खाजगी करीत आहेत. के. व्हि पेंढारकर काँलेजचे खाजगीकरण झाल्यास तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रचंड लुट केली जाणार आहे. काँलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी हजारो लाखो रुपयांची मागणी केली जाणार आहे.
सदर जमीनीचा खाजगी वापर केल्यास शासनाने ही जमीन त्या संस्थेकडून काढून घ्यावी, व विनाअनुदानित काँलेजचा प्रस्ताव मागे घेईपर्यंत पेंढारकर काँलेजवर प्रशासक नेमण्यात यावे, तसेच सदर जमिनीचा देसाई यांनी आधीच मनमानी पद्धतीने व बेकायदेशीररीत्या वापर करून जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रभाकर देसाई व संबंधित संस्थेच्या संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र पुनर्वसन समिती डोंबिवली तर्फे करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *