1 min read

शिक्षण विभागाच्या नव्याने नियुक्त झालेल्या मुख्य सचिव श्रीमती कुंदन मॅडमयांना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी केला पाठपुरावा

Loading

शिक्षण विभागाच्या नव्याने नियुक्त झालेल्या मुख्य सचिव श्रीमती कुंदन मॅडम
यांना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा

जळगांव प्रतिनिधी
मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी मुंबई मंत्रालय येथे आमदार सत्यजित तांबे साहेब यांचे सोबत शालेय शिक्षण विभागाच्या नव्याने नियुक्त झालेल्या मुख्य सचिव माननीय श्रीमती कुंदन मॅडम यांची भेट घेऊन त्यांचे महासंघाच्या वतीने स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्वासित परंतु प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत चर्चा झाली, त्यात प्रामुख्याने वाढीव पदांचे समायोजन, एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांचा जुन्या पेन्शन योजनेत समावेश, आयटी शिक्षकांचा अनुदानित पदावर समायोजनाचा शासनादेश,आश्वासित प्रगती योजना, वाढीव टप्पा अनुदान, पटसंख्येचा निकष शिथिल करणे, सेवानिवृत्तीचे वय 60 करणे या व इतर मागण्या त्यांनी समजून घेतल्या. एक मार्च 2024 रोजी झालेल्या चर्चेचा आढावा घेऊन आश्वासित परंतु प्रलंबित असलेल्या मागण्यांवर निश्चितपणे कार्यवाही केली जाईल असे सचिव कुंदन मॅडम यांनी सांगितले. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव मान श्री तुषार महाजन साहेब यांची देखील भेट घेऊन प्रलंबित मागण्यांबाबतची सदयस्थिती जाणून घेऊन त्या संबंधित लवकरात लवकर आदेश निघण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती केली. याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष डॉ संजय शिंदे व समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर सर उपस्थित होते. या सर्व समन्वयक बैठकीसाठी आमदार मान श्री सत्यजित तांबे साहेब यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल महासंघ त्यांचे आभार मानत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *