जॉर्ज फर्नांडिस एक राजकीय वादळी व्यक्तीमत्व ! शरद पवार
1 min read

जॉर्ज फर्नांडिस एक राजकीय वादळी व्यक्तीमत्व ! शरद पवार

Loading

जॉर्ज फर्नांडिस एक राजकीय वादळी व्यक्तीमत्व ! शरद पवार

( मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे)

देशाच्या राजकारणात जॉर्ज फर्नांडिस एक वादळी व्यक्तिमत्व आणि नेतृत्व होते असे प्रतिपादन देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले. संपत्ती नाही., अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती पण न डगमगता कष्टकरी, कामगार नेते. म्हणून जॉर्ज फर्नाडिस यांची देशाला ओळख आहे अनेक भाषा ज्ञात असलेला व खंबीर नेतृत्व लाभलेला व आपल्या कार्यकर्त्यांत रमलेला असा हा सर्वसामान्य जनतेचा नेता होता असे गौरवोद्गार शरद पवार यांनी जॉर्ज यांच्यासोबतच्या आठवणी जाग्या करताना काढले.
आणीबाणीची 50 वर्षे. 25 जून 1975 ते 25 जुन 2025. चित्रफीत. या कार्यक्रमात दाखविण्यात आली. महाराष्ट्र गीत व राष्ट्र गीताने कार्यक्रम सुरूवात झाली.
जाँर्ज फर्नांडिस सारख्या समाजवादी विचारधारा असलेल्या नेत्यांच्या कार्यक्रमासाठी आदरणीय
श्री. शरद पवार साहेबांसारखा दुसरा नेता प्रमुख पाहुणे म्हणून आवश्यक आहे अशी भावना सर्वच जाँर्ज फर्नांडिस चाहत्यांनी व्यक्त केली होती अशी माहिती कपिल पाटील यांनी दिली.
लेबर युनियनच्या पुढाकाराने के. सी. कॉलेज, चर्चगेट येथे जॉर्ज फर्नांडिस यांना मानणाऱ्या समाजवादी कामगार संघटनांचा संयुक्त निर्धार मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय शरद पवार यांनी जॉर्ज यांच्यासोबतच्या आठवणी सांगितल्या. अध्यक्षस्थानी हिंद मजदूर किसान पंचायतचे अध्यक्ष कपिल पाटील होते. निमंत्रक मुंबई लेबर युनियनचे जनरल सेक्रेटरी संजीव पुजारी होते.

यावेळी जॉर्ज यांचे वयोजेष्ठ सहकारी सुभाष मळगी, पद्मनाभ शेट्टी, विजय नारायण सिंह, मोतीलाल कनोजिया, देवी गुजर, शंकर साळवी, शंकर शेट्टी, फेड्रिक डिसा, संजीव पुजारी, सुरेश ठाकूर यांना जॉर्ज फर्नांडिस जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

 

 

 

या मेळाव्यात राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीचे नेते विश्वास काटकर, माजी खासदार अनिल हेगडे, एसटी कर्मचाऱ्यांचे नेते हनुमंत ताठे, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस अशोक जाधव, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड, जॉर्ज यांचे सहकारी अभिषेक रंजन, क्रांती प्रकाश, एस. एस. मेहरा, शब्बीर अहमद विद्रोही, दी म्युनिसिपल युनियनचे रमाकांत बने, बेस्ट कर्मचाऱ्यांचे नेते रंगनाथ सातवसे, घरकामगारांच्या नेत्या मधू बिरमोळे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नेते शिवाजी खांडेकर, एचएमकेपीचे पी. व्ही. फडतरे, प्रफुल्ल म्हात्रे, बीएमसी कर्मचारी नेते रमेश भुतेकर, वामन काविस्कर यांच्यासह अनेक कामगार नेते, कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. छात्र भारतीचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *