1 min read

स्वच्छता हीच आरोग्याची गुरुकिल्ली.डॉ.रमेश धापते

Loading

स्वच्छता हीच आरोग्याची गुरुकिल्ली.
डॉ.रमेश धापते

असोदा – मानवी जीवनामध्ये संस्कार आणि स्वच्छता हे अत्यंत महत्त्वाचे असून स्वच्छता ही आरोग्याची गुरुकिल्ली असून विद्यार्थी जीवनात आपण या गोष्टी अंगीकारल्यास निश्चितपणे जीवनामध्ये सुदृढ आरोग्याची बक्षीस आपल्याला मिळत असते असे मत जळगाव जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रमेश धापते यांनी
सार्वजनिक विद्यालय असोदा येथे अतिसार पंधरवाड्या अंतर्गत आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले, विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक उपयुक्त माहिती त्यांनी सांगितली. आरोग्य सेविका यांनी विद्यार्थ्यांना हात कसे धुवावे याविषयी प्रात्यक्षिक करून दाखविले.अतिसाराचा त्रास होत असेल तर ओ. आर. एस. (जल संजीवनी )वापरले पाहिजे याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. याप्रसंगी डॉ. पराग पवार (वैद्यकीय अधिकारी जिल्हा परिषद ) महेंद्र वानखेडे, (आरोग्य सहायक )विजय पवार (आरोग्य सेवक ) किरण तट्टे (आरोग्य सेविका )उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांनी केले. सूत्रसंचालन सचिन जंगले यांनी तर आभार भावना चौधरी यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *