1 min read

पिंपळी हायस्कूलचे मुख्याध्यापक जे .पी पवार यांचा सेवानिवृत्त निमित्ताने सहपत्निक सत्कार

Loading

नुतन मुख्याध्यापक विकास शेलकर व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे.पी.पवार यांचा सहपत्निक सत्कार करतांना
संस्थेचे अध्यक्ष प्रेमराज चव्हाण सत्कार करतांना

पिंपळी हायस्कूलचे मुख्याध्यापक जे .पी पवार सेवानिवृत्त निमित्ताने सत्कार

अमळनेर प्रतिनिधी- पिंपळी तालुका अमळनेर येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक जे पी पवार हे नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला..
जे.पी पवार यांची 30 वर्ष सेवा झाली. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने नुकताच शाळेत कार्यक्रम संपन्न झाला
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष प्रेमराज वामन चव्हाण होते तर प्रमुख अतिथी संस्थेचे उपाध्यक्ष संतोष गजमल महाजन, स्कूल कमिटीचे चेअरमन जनार्दन मांगो शेलकर, व्हाईस चेअरमन डॉ जीवनलाल भिवसन जाधव, सचिव हिम्मत श्रावण चव्हाण होते.
कार्यक्रमाची प्रस्ताविक शाळेचे शिक्षक आर के सोनवणे यांनी केले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे पी पवार यांच्या बद्दल शाळेचे मुख्याध्यापक विकास शेलकर यांनी मनोगत व्यक्त केले..
संस्थेचे अध्यक्ष प्रेमराज चव्हाण म्हणाले की जे.पी.पवार यांनी सेवानिवृत्त नंतर सामाजिक कामांना प्राधान्य द्यावे असे सांगत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पिंपळी संस्थेच्या व शाळेच्या वतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे पी पवार व सौ वंदना पवार यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला..
सत्काराला उत्तर देतांना सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे पी पवार म्हणाले की
शाळेत काम करत असतांना सकारात्मक विचार राहिले तर कोणतेही काम अशक्य नाही असे सांगत संस्थेचा व शाळेच्या कर्मचाऱ्यांचा मनस्वी धन्यवाद व्यक्त केले. मी नेहमी संस्थेच्या ऋणात राहील असे सांगितले..
कार्यक्रमाला मुख्याध्यापक विकास शेलकर, शिक्षक आर के महाजन, आर के सोनवणे, डी.एम सावळे, डी.पी चव्हाण, एस एस पाटील सह गावातील नागरिक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
शेवटी कार्यक्रमाचे आभार आर. के सोनवणे यांनी मानले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *