किशोर पाटील सर खान्देश स्टार अवॉर्ड ने सन्मानित
![]()
किशोर पाटील सर खान्देश स्टार अवॉर्ड ने सन्मानित
आज दिनांक 16जून रविवारी अल्पबचत भवन जळगाव येथे मुक्ताई बहुउद्देशीय संस्था आणि हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खानदेश स्टार अवॉर्ड 2024 या सुंदर अशा छोट्याखणी कार्यक्रमात जळगावच्या महापौर जयश्रीताई महाजन मुक्ताई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नीताताई सोनवणे राईसोनी कॉलेजचे माननीय रफीक शेख हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संचालिका आदरणीय भारतीताई काळे मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंद भाऊ रोटे हेमंत दादा भंगाळे जन्मात प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय पंकज जी नाले या मान्यवरांचे उपस्थितीत मोठ्या थाटात अनुदानित आदिवासी आश्रम शाळा डोमगाव येथील शिक्षक श्री किशोर पंढरीनाथ पाटील यांना ज्ञानवंत शिक्षक पुरस्कार देऊन अध्यक्ष जयश्रीताई महाजन यांच्या शुभहस्ते खानदेश स्टार अवॉर्ड 2024 देण्यात आला या पुरस्काराबद्दल सर्व मित्र परिवाराकडून स्नेहीजनांकडून श्री किशोर पाटील सरांवर कौतुकाचा अभिनंदन होत आहे सदर पुरस्काराचे श्रेय श्री किशोर पाटील सर यांनी त्यांचे गुरुजन व सर्व आदिवासी विद्यार्थी यांना दिले आहे सदर पुरस्काराने एक नवा उत्साह व प्रेरणा मिळाली आहे असे श्री किशोर पाटील सर म्हणाले..
चौकट-
श्री किशोर पाटील सर उजैंकर फाऊंडेशन मुक्ताईनगर चे जिल्हाध्यक्ष आहेत डॉ शिवचरण उज्जैन कर सर यांनी आणि संपूर्ण फाऊंडेशन च्या पदाधिकारी यांनी किशोर पाटील सर यांचे अभिनंदन केले आहे


