1 min read

हिंदी अध्यापक मंडळाचे अभ्यासू व्यक्तिमत्व दिलीपजी पाटील

Loading

हिंदी अध्यापक मंडळाचे अभ्यासू व्यक्तिमत्व दिलीपजी पाटील

काही माणसे मनाने फार स्वच्छ व प्रामाणिक असतात.. आपण समाजाचे देणे लागतो ही एक सामाजिक बांधिलकी ठेवून आपल्या हातून जेवढी शैक्षणिक सेवा होईल तेवढे ते करण्यासाठी नेहमीच धडपड करत असतात असे धडपड करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे दिलीपजी पाटील सर…
साने गुरुजी नूतन ते कन्या विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक ,मितभाषी व्यक्तिमत्व, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस ,आमचे मार्गदर्शक, मा. बापूसो दिलीपजी पाटील यांचा आज 55 वा वाढदिवस…
हिंदी अध्यापक मंडळाचे काम करत असतांना मंडळाचे सचिवपदी दिलीपजी पाटील अत्यंत इमानेइतबारे मंडळाला वेळ देऊन चांगल्या प्रकारे ते काम करीत असल्याचा मंडळाला सार्थ अभिमान आहे..
हिंदी अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्षपदी दीपकजी पाटील असतानाही मंडळाचे सचिवपद सरांनी अत्यंत जबाबदारीने सांभाळले.. सध्या मंडळाचे तालुकाध्यक्ष आशिष शिंदे असतांना मंडळाचे सचिवपद दिलीप पाटील हे चांगल्याप्रकारे सांभाळत अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये ते भाग घेत असतात व मंडळाला मार्गदर्शन करत असतात.. त्यांचा मितभाषी स्वभाव ,मदतीसाठी धावून येण्यासाठी नेहमीच ते कटीबद्ध असतात ..जास्त न बोलता थोडक्यात बोलणं सरांना आवडते…असं म्हणतात….
चांगले मित्र आणि औषधे ही
आपल्या आयुष्यातील वेदना
दूर करण्याचे काम करतात
फरक इतकाच की, औषधांना
असते ‘एक्सपायरी डेट’
पण मैत्रीला नाही!!!
असे हिंदी अध्यापक मंडळ आहे…. मंडळाचा एक- एक पदाधिकारी लाख मोलाचा आहे… हे तेवढेच सत्य आहे..
मंडळाच्या सर्वच सदस्य व पदाधिकारी मंडळाच्या सर्वच पदाधिकारी, सदस्य यांच्या सुखदुःखामध्ये नेहमीच सामील होतात..हिंदी मंडळ हे मंडळ नसून एक परिवार आहे… हिंदी अध्यापक मंडळ तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी, वाढदिवस, यश निवड यामध्ये नेहमीच कौतुकाची थाप ठेवण्यासाठी मंडळ नेहमीच कटीबध्द असते…
दिलीप पाटील सर हे सचिव – हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर,
शिक्षक प्रतिनिधी – सानेगुरुजी कन्या हायस्कूल . अमळनेर ,शालेय समिती सदस्य – व्हि झेड् हायस्कूल शिरुड
विविध पदांवर ते कार्यरत आहेत..।
यांना वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द
तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो, हीच मनस्वी शुभकामना, उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!

ईश्वर आर महाजन पत्रकार
प्रसिद्धी प्रमुख- हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर
9860352960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *