1 min read

प्रगत विचाराची सम्राज्ञी अहिल्याबाई होळकर .

Loading

प्रगत विचाराची सम्राज्ञी अहिल्याबाई होळकर .

भारत देश हा मुळ नागवंशीयांचा देश होय. भारतात गणराज्य संस्कृती होती. गणाचा राजा गणपती असायचा.आपण पुजतो तो गणपती नव्हे. विविध प्रांत त्याचा प्रमुख असायचा त्यानुसार त्यांना नावे दिली गेली होती. खंडोबा, भैरोबा, जोतिबा ही आपापले प्रांत सांभाळणारे सरदार होते. शिवाला आराध्यदैवत मानणारे नागवंशीय लोक होते. नागांचे विविध प्रमुख होऊन गेले. तक्षक, शेष यासारखी लोक. ते शिवाचे भक्त म्हणून शिवाचे लाडके लोक म्हणून त्यांना शिवाच्या गळयात तसेच सेवा करण्यास दाखविले. अहिल्याबाईचे वडिल मालकोजी शिंदे हे शिवभक्त होते. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात चौडी या गावात अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला. ह्या गावाला लागुन एक नदी होती. त्यामुळे गावात शेतीला पुरक पाणी असल्याने शेती समृध्द होती. धनगर समाजाची वस्ती असलेले कष्टाळु गाव होते. सीना नावाच्या नदीमुळे गावात पशुपालन हा व्यवसाय होता. माणकोजी शिंदे व सुशीलाबाई शिंदे यांना अहिल्याबाई नावाची मुलगी झाली. तिचा जन्म 31 मे 1726 चा होता. माणकोजी हे धनगर होते त्यामुळे त्यांच्याकडे शेळया मेंढया पालनाचा पिढीजात व्यवसाय होता. त्यांना पाटीलकी मिळाली होती. ते खूप न्यायप्रिय होते. कुणावर अन्याय होणार नाही याची ती काळजी घ्यायचे. गावकरी त्यांना मानसन्मान देत असत. चौडी हे गाव एकोपा असलेले गाव होते. सीनेश्वर नदीवरुन देवाचे म्हणजे महादेव म्हणजेच सीनेश्वर पडले. त्याकाळी पुणे भागात सत्तेवर पहिले बाजीराव पेशवे होते. त्यांचा सुभेदार मल्हारराव होळकर होते. एकदा हे दोघे पुणे जात असतांना चौडी गावाकडून निघाले. रस्त्यात चौडी गावात त्यांना तहान लागल्याने ते थांबले. तिथे लहान अहिल्या व तिच्या मैत्रिणी खेळत होत्या. त्यांना ह्या दोघांनी पाणी मांगितले. त्यावेळेस अहिल्याबाई ने पाण्यासोबत कादां भाकरी चटणी दिली. अहिल्याबाई चा धीटपणा पाहुन मल्हाररावांनी तिला नाव वगैरे विचारुन चौकशी केली. आपल्या मुलाला अशी मुलगी पाहिजे ती सरदारकी सांभाळेल. त्यांनी माणकोजी ची भेट घेऊन काही दिवसांनी बालवयात म्हणजे 12 वर्षाची असतांना खंडेराव होळकर यांच्याशी 20 मे 1733 ला विवाह झाला. मल्हारराव हे पेशव्यांचे प्रामाणिक सरदार होते. त्यांनी अनेक युध्दात पेशव्यांना साथ दिली होती. त्या मोबदल्यात त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळाली. महिलांना सन्मान देण्याची परंपरा होळकर घराण्यात होती. अहिल्याबाई च्या चाणाक्षपणामुळे तिला युध्दकलेचे, न्यायाचे, मूल्याचे शिक्षण घरी दिले. अहिल्याबाई ने सर्व शिक्षण घेतले. अनेक शिक्षक अहिल्याबाई ला शिकवायला होते. राजकारणाचे बाळकडू अहिल्याबाई ला मल्हारराव यांनी पाजले. प्रत्येक विषयाचे तंतोतंत ज्ञान अहिल्याबाई ने घेतले. प्रत्यक्ष न्यायनिवाडा करतांना अहिल्याबाई ला समोर बसविले. अहिल्याबाई खूप हुशार, तरबेज, निष्णात बनली. इंदूर संस्थानची जबाबदारी मल्हाररावांनी अहिल्याबाई कडे दिली.खंडेराव एके दिवशी कुंभेरीची मोहिम चालु असतांना किल्यावर त्यांच गोळी लागुन निधन झाले. अहिल्याबाई व खंडेरावांना 2 अपत्य होते. मालेराव व मुक्ताबाई. त्यावेळेस सती जाणे ही प्रथा होती. मल्हारराव कर्मठ विचाराचे नव्हते. त्यांनी अहिल्याबाई ला धीर दिला. सती प्रथेपासून वाचविले. वर्षभराने खंडेरावाचे श्राद्ध आले त्याला ब्राम्हणांनी तर्पण करण्याचे सुचविले. अहिल्याबाई ने कर्मठ प्रथेला विरोध केला. युध्दासाठी सैनिकांना मुक्काम करण्यासाठी तसेच पाऊसाचे पाणी गावात शिरून गाव, शहर यांचे नुकसान होऊ नये म्हणून नदी काठावर संरक्षक भींती व काठाची उभारणी केली. अहिल्याबाई कडे भविष्यकालीन दृष्टी होती. गनिमी कावा ह्या शिवरायांच्या कौशल्याचा अभ्यास होता. त्यामुळे सैन्य कमी असतांना युध्दे जिंकली. कणखर, तरबेज, ध्येयवादी, विवेकी, चिकित्सक, वैज्ञानिक दृष्टी असलेल्या अहिल्याबाई ला मनुवाद्यांनी दैववादी ठरविले.अहिल्याबाई यांच्या अतुलनीय इतिहास झाकण्यासाठी त्यांच्या हातात शिवाची पिंड दिली. रघुनाथ पेशवे यांचे मनसुभे अहिल्याबाईंनी गुप्तहेर यंत्रणा अभेद्य असल्याने धुडकाऊन लावले. राघोबा पेशवेला ठणकावून त्याची जागा दाखवून दिली. अहिल्याबाई ह्या विवेकी होत्या. त्यांनी कर्मठ विचारसरणीच्या काळात आपल्या मुलीचा विवाह आंतरजातीय पध्दतीने लावुन दिला. त्या काळात प्रबोधनाची दृष्टी असलेल्या अहिल्याबाई कर्मठ कश्या असतील? त्या अभ्यासू, धीट, धाडसी, कर्तबगार, कर्तव्यदक्ष राजकारणी होत्या. त्या व्यासंगी होत्या. युध्द करण्याच्या अगोदर त्या समोरच्या शत्रूची सारी माहिती घेत. त्या हिंदू धर्मीय होत्या परंतू त्यांनी इंदौर प्रांतातील बऱ्याच ठिकाणी मस्जिद बांधण्यास सहकार्य केले. अनेक गुप्तहेर त्यांच्याकडे मुस्लिम होते. सर्वधर्मीय सन्मान देण्याची वृत्ती त्यांची दिसून येते. अनेक लेखकांनी अहिल्याबाई चा खरा इतिहास पुढे येऊ दिला नाही. आमचे लोक ह्या शूर राणीचा फोटो पिंड घेऊन दाखवितो. युध्दात निष्णात, राजकारणात तरबेज, दूरदृष्टी, विवेक, चिकित्सक, समतावादी, समावादी, धर्मनिरपेक्ष, प्रज्ञाशील, पराक्रमी राणीला कर्मठ विचारात बघतात हे योग्य नाही. अशा थोर सम्राज्ञीस विवेकाच्या नजरेने बघुया!!

एस.एच. भवरे
पत्रकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *