मुंबई शिक्षक मतदारसंघात नवीन ट्विस्ट
![]()
मुंबई शिक्षक मतदारसंघात नवीन ट्विस्ट
भाजपाकडून इच्छुक अनिल बोरनारे यांनी घेतले 2 उमेदवारी अर्ज एक भाजपाच्या नावे तर दुसरा अपक्ष

(प्रतिनिधी) भाजपाकडून मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुक असलेले उमेदवार शिक्षक नेते व भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी आज निवडणूक कार्यालयातून दोन उमेदवारी अर्ज घेतले असून त्यामध्ये एक भाजपाच्या नावाने असून दुसरा अपक्ष म्हणून घेतला असल्याने अनिल बोरनारे निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मागील १८ वर्षात मुंबईतील शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते प्रश्न सोडविणे, बंद पडत असलेल्या अनुदानित शाळा टिकविणे, शिक्षक अतिरिक्त होण्यापासून वाचविणे व विद्यार्थी संख्या वाढविणे या सर्वांसाठी एक ब्ल्यू प्रिंट बनविली असून निवडून आल्यावर सीएसआर च्या माध्यमातून शाळांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणणार असल्याचे बोरनारे यांनी सांगितले.

