1 min read

मुंबई शिक्षक मतदार संघातून भाजपाचे अनिल बोरनारे यांनी ठोकला दावा

Loading

मुंबई शिक्षक मतदार संघातून भाजपाचे अनिल बोरनारे यांनी ठोकला दावा

निवडणूक लढण्यावर अनिल बोरनारे ठाम

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य व शिक्षक नेते अनिल बोरनारे यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे ठरविले असून भाजपाकडून उमेदवारी मागितली आहे.
बोरनारे हे मुंबईतील शाळेत शिक्षक असून मागील २५ वर्षांपासून शिक्षकांचे प्रश्न सोडवीत आहेत. शिक्षकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी शेकडो धरणे आंदोलन केली
शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यात बोरनारे यांचा रेकॉर्ड नोंदविला गेला आहे. अनिल बोरनारे भाजपाचे प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य असून मुंबई मराठी अध्यापक संघ तसेच जुनी पेन्शन संघर्ष समितीचे ते अध्यक्ष आहेत
मुंबईत त्यांनी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची नोंदणी केली असून शाळाशाळांमध्ये त्यांनी प्रचार केला असून कार्यअहवालाचे वाटप सुरू आहे.
२०१८ मध्ये शिक्षक परिषदेने बोरनारे यांना उमेदवारी दिली होती परंतु भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन भाजपा उमेदवाराला पाठिंबा दिला होता. आता मात्र अनिल बोरनारे हे निवडणूक लढण्यावरून ठाम असून भाजपा त्यांना उमेदवारी देते की नाही यावर शिक्षणक्षेत्रात चर्चा होतांना दिसत आहे.

अनिल बोरनारे
8879115943
9324764033

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *