1 min read

“जीवन म्हणजे क्रिकेट राजा मुकला तो संपला..”

Loading

जीवन म्हणजे क्रिकेट राजा मुकला तो संपला..”

वरील गाण्याची अनुभूती आजच्या आयपीएल क्रिकेट मधील आरसीबी विरुद्ध सीएसके सामना बघताना आला.. जीवन आणि क्रिकेट याचा फारच जवळचा संबंध आहे.. असं मला वाटतं.. कारण क्रिकेट खेळताना आणि जीवन जगताना सारख्याच गोष्टींची जाणीव ठेवून जगाव लागतं,खेळावं लागतं.. आजची मॅच ही डू ऑर डाय अशा सिच्युएशनची होती.. फक्त त्यात अट अशी होती की, आरसीबी ने 18 धावांनी चेन्नईवर विजय मिळवला पाहिजे होता.. प्रथम फलंदाजी करताना विराट आणि दुपलिसिसने छान खेळ करत 218 धावांची मजल मारली.. आता चेन्नई ला सुपर फोर मध्ये क्वालिफाय होण्यासाठी 201 धावांची गरज होती आणि मॅच जिंकण्यासाठी 219 धावांची.. खेळ सुरू झाला पहिल्याच ओव्हर मध्ये मॅक्सवेल ने आरसीबी ला विकेट मिळवून दिली.. पण रचिन रवींद्र आणि राहणे यांनी चांगला खेळ करत चेन्नईच्या अशा पल्लवीत ठेवल्या.. चेन्नई सामना जिंकणार नाही पण 201 धावा नक्की करेल.. अशी सर्वांना खात्री वाटत होती.. सामना पुढे सरकला आणि शेवटच्या ओवर पर्यंत आला… शेवटच्या ओवरच समीकरण असं होतं की,सहा चेंडूंमध्ये 17 धावांची कॉलिफिकेशन साठी गरज होती.. म्हणजेच 201 धावा करण्याची.. आणि स्ट्राइकला होता दस्तुरखुद्द धोनी ‘धोनी है तो मुमकिन है..!’असं सगळ्यांनाच वाटत होतं.. मलाही तेच जाणवत होतं.. मी आरसीबीच्या सोबत असलो, तरी आता आरसीबी काही जिंकत नाही.. कारण समोर धोनी होता.. शेवटची ओव्हर यश दयाल याला देण्यात आली.. पहिल्याच चेंडूवर महेंद्रसिंग दे दनादन धोनीने चक्क 110 मीटर दूर एक भला मोठा सिक्स मारला.. हा चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला… सगळ्यांच्या नजरा हवेत होत्या आणि सगळं स्टेडियम आवाजाने अगदी दुमदुमून उठलं होतं…पाच चेंडू आणि 11 धावा.. हे तर अतिशय सोप्प समीकरण होतं.. आणि धोनी असताना तर अधिक सोपं.. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराट कोहलीचा चेहरा पार पडला होता.. कारण त्याने पूर्ण सीजन मध्ये फार मेहनत घेतली होती.. आणि तरी सुद्धा आपल्याला क्वालिफाय होता येणार नाही..याच दुःख स्पष्ट त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं.. आरसीबी चे फॅन सुद्धा चिंतेत होते.. यश दयाल चा दुसरा चेंडू पडला आणि त्याने तो स्लोवर टाकला आणि धोनीने जोरात त्याला टोलवला पण सीमारेषेवर असलेल्या स्वप्निल सिंग च्या हातात तो जाऊन विसावला.. हे पाहून कॉमेंटेटर आणि आरसीबीच्या सगळ्या फॅन्स ने अक्षरशः स्टेडियम डोक्यावर घेतलं.. आता चार चेंडूत पुन्हा 11 धावा लागणार होत्या.. आता rcb ला जिंकण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.. यश दयालच्या हिमतीची या ठिकाणी मी स्तुती करेल.. कारण पहिल्या चेंडूवर गगनचुंबी सिक्सर मारल्यानंतर देखील धीर आणि कॉन्सन्ट्रेशन न गमावता पुढचा चेंडू लाईन अँड लेन्थ वर टाकत.. त्याने धोनीची विकेट मिळवली.. जीवनातही या घटनेपासून फार मोठा धडा घेता येऊ शकतो… अपयश जरी आलं, तरी मोठ्या उमेदीने आपण उठून पुन्हा जीवणाची सुरुवात करू शकतो.. आणि जो जीवनात प्रयत्न करत राहील त्याला मात्र यश नक्की मिळेल.. ज्याने शेवटपर्यंत हार मानली नाही.. त्याला यश मिळणं खरोखरच अशक्य नाही.. शार्दुल ठाकूरला तिसरा चेंडू यश दयाने डॉट टाकला आणि समीकरण झाले तीन चेंडूत कॉलिफिकेशन साठी 11 धावा आणि जिंकण्यासाठी 28 धावा.. जिंकणं जवळजवळ असंभव होतं.. चौथ्या चेंडूवर शार्दुलने एक धाव घेत स्ट्राइक रवींद्र जडेजा कडे दिली आणि आता समीकरण होतं मागच्या आयपीएलच्या फायनल ची आठवण देणार.. ते म्हणजे दोन चेंडूत 10 धावा.. परंतु चमत्कार प्रत्येक वेळेस घडत नाहीत हिम्मतवाल्यालाच आणि प्रयत्न करणाऱ्यालाच नशीब साथ देत असतं.. आणि आजचा दिवस हा यश दयाल च्या नावावर होता.. पाचवा आणि सहावा दोघेही चेंडू यशने डॉट टाकले आणि आरसीबीच्या यशावर सुवर्णमोहर लावत सुपर फोर मध्ये कॉलिफिकेशन मिळवली.. विराट कोहली आणि त्याची संघ सहकार्यांनी एकच जल्लोष केला..

वरील उदाहरणावरून एकच सांगता येईल की जीवनात देखील आपण शेवटपर्यंत आपली लढाई लढत राहावी.. संकट येतील,जातील काही संकटांपासून शिकायचं असतं.. काही गोष्टी आपण टाकून द्यायच्या.. काही गोष्टी सोबत घेऊन पुढे चालत राहायचं.. तरच यश मिळू शकत.. हेच याच्यावरून सांगता येईल..
लेखक-शरद भिका पाटील उपशिक्षक, विजय नाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अमळनेर जि. जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *