1 min read

मुख्याध्यापक हिंमतराव पाटील यांचासेवापूर्ती सोहळा व निरोप समारंभ” उत्साहात संपन्न

Loading

सेवानिवृत्त मुख्याध्यापक हिम्मतराव पाटील आपले मनोगत व्यक्त करतांना
सेवापूर्ती सत्कार सोहळ्यात मान्यवर हिम्मतराव पाटील यांच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त करतांना

मुख्याध्यापक हिंमतराव पाटील यांचा
सेवापूर्ती सोहळा व निरोप समारंभ” उत्साहात संपन्न

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
कुसुंबे ता. चोपडा येथील रहिवाशी. आणि अमळनेर येथे स्थाईक
झालेले ग्रेडेड मुख्याध्यापक जि. प. शाळा बाम्हणे. ता. एरंडोल या शाळेतून सेवानिवृत्त झाले. त्यांनी सेवाकाळात सुरवात कनाशी ता. भड‌गाव येथुन सुरवात करून एकलहरे खडके झाडी ता. अमळनेर उत्रड ता. पारोळा अशा विविध शाळेत सेवा करून बाम्हणे ता.एरंडोल या .जि.प. शाळेवर ग्रेडेड मुख्याध्यापक म्हणून ३०/५/२०२४ रोजी वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी सेवानिवृत्त झाले. सरांनी संपूर्ण सेवा काळात सेवारत असलेल्या प्रत्येक शाळेचा दर्जा उच्चावण्यासाठी
शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी समाजाचा सहभाग घेऊन लोकवर्गणी करून शाळांचा चेहरा बदलून सुंदर स्वच्छ शाळा बनवल्या स्वत: चे अध्यापन कौशल्य वापरून, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शाळेत गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक धोरण राबवून मुलांन मध्ये कौशल्यांची रुजावत करून परिपूर्ण शाळा बनवल्या.सरांनी वेळोवेळी स्वत: च्या पगारातून शाळेसाठी मुलांनसाठी पदरमोड करून गरजा पूर्ण केल्या.
सर शिक्षक म्हणून परिपूर्ण होते. श्रम करण्याची ईच्छाशक्ती समाजात मिसळून समाजाचा शाळेसाठी सहभाग सतत प्रवाही ठेवला. अध्यापना सोबत शिक्षक संघटना आणि शिक्षक पतपेढयामध्ये मोठे योगदान दिले. पारोळा पतपेढी मध्ये पत्नी सौ. नूतन हिंमतराव पाटील यांना संचालक पदावर विराजमान करून पतपेढीला वैभव प्राप्त करून दिले. सौ. नूतन हिंमतराव पाटील यांना उत्तम शैक्षणिक कार्य म्हणून. जि. प. जळगाव यांच्या करून मानाचा समजला जाणारा आदर्श शिक्षिका हा पुरस्कार मिळाला.
सरांचे उपजत गुण सतत समाज सेवा करुणा यामुळे त्यांनी जिल्हाभरात मोठा मित्र परिवार जमवून मानाचे स्थान प्राप्त केले.समाजसेवा करत असताना स्वतःच्या मुला-मुलींना मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवून, इंजिनिअर, मेडीकल ऑफिसर बनवले. मुलगा हर्षल सुध्दा प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून लवकरच कार्यरत होईल. अशा सेवाभावी सरांचा सेवापूर्ती सोहळा. त्यांना त्याच्या कार्याला साजेसा भव्यदिव्य करण्याचा मानस, कुंटुबाने,मित्रपरिवार, सहकर्यानी, समाजाने. अमळनेर नगरीत श्री. छत्रपती शिवाजी महाराज नाट्य गृहात आयोजीत केला. या भव्यदिव्य कार्यक्रमात दि० ३मे २०२४ रोजी संपन्न केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उपशिक्षण अधिकारी श्री. आबासाहेब एस. के वानखेडे यांनी भूषवले. प्रमुख अतिथी श्री. सातपुते सर (प्राचार्य / सिनेट सदस्य नागपूर विद्यापीठ) नाशिक येथून सहाय्यक शिक्षण उपनिरिक्षक श्री देवरे सर, श्री.आर.डी. महाजन ग. शि. एरंडोल, श्री. व्ही. एच. पाटील (ग.शि. पारोळा) श्री- रावसाहेब पाटील ग.शि. अमळनेर श्री जे. डी. पाटील सर, श्रीमती कविता सुर्वे वि.अ. अमळनेर
श्री. सी. एन. चौधरी वि.अ. पारोळा, विशेष अतिथी. निवृत्त न्यायधिश साहेब – श्री गुलाबराव पाटील अमळनेर यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाचे संचलन सौ. वसूंधरा लांडगे मॅडम निवृत्त शिक्षिका- सानेगुरुजी शाळा यांनी कवितेच्या माध्यमातून रंगत आणली.
प्रास्तावीक सौ. नुतन हिंमतराव पाटील यांनी केले.सदर कार्यक्रमात श्री सातपुते सर, श्री वानखेडे सर, श्री गुलाबराव पाटील व कुटुंबियांच्या वतीने कु .हर्षल पाटील, डॉ. श्रद्धा पाटिल, सौ. आशा पाटिल. तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी व मित्र परिवार यांनी गुणगौरव पर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला ज्या सर्वांनी शोभा आणली त्या सर्वाचे आभार आणि मनोगत श्री हिंमतराव सरांनी व्यक्त केले.सुरुची भोजनाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *