घटनेच्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टी करणं म्हणजे जर चाणक्य नीति असेल तर ही चाणक्य नीति मतदारांच्याविरुद्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी या गोष्टीला नकार दयावा-कायदे तज्ञ अँड असीम सरोदे
![]()
घटनेच्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टी करणं म्हणजे जर चाणक्य नीति असेल तर ही चाणक्य नीति मतदारांच्याविरुद्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी या गोष्टीला नकार दयावा-कायदे तज्ञ अँड असीम सरोदे
“निर्भय बनो आंदोलनाचा विरोध मोदी-शहांना नाही, तर त्यांच्या स्वार्थी राजकारणाला-सामाजिक कार्यकर्ते डॉ विश्वंभर चौधरी यांचे प्रतिपादन


अमळनेर येथील” निर्भय बनो” सभेला वैचारिक लोकांची मोठी गर्दी
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी व कायदेतज्ज्ञ अँड असिम सरोदे, जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याकडन निर्भय बनो हे अभियान सुरु आहे. या अभियानाच्यावतीनं राज्यातील विविध शहरात सभांचं आयोजन करण्यात येत आहे. अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर शाळेमध्ये ८ मे रोजी संध्याकाळी सात वाजता सामाजिक संघटना आयोजित जाहीर सभेमध्ये एडवोकेट असीम सरोदे व डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी भारतीय लोकशाही व संविधानाच्या संरक्षणासाठीचा लढा समजून घेण्यासाठी व देशातील हुकुमशाहीचा अस्त करण्यासाठी व लोकशाही वाचवण्यासाठी
निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मतदान करावे असे आवाहन केले..
अँड असिम सरोदे म्हणाले कि सध्या जे राजकारण सुरू आहे ते असंवैधानिकदृष्ट्या सुरू आहे. हे अतिशय चुकीच आहे असं माझं स्पष्ट मत आहे. घटनेच्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टी करणं म्हणजे जर चाणक्य नीति असेल तर ही चाणक्य नीति मतदारांच्याविरुद्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी या गोष्टीला नकार दिला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सगळे राजकारण नासवलेलं आहे. अत्यंत विद्रूप राजकीय चेहरा म्हणून ते पुढे आलेले आहेत.अशी टीका अँडअसीम सरोदे यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की महाराष्ट्र च्या राजकारणात गैरव्यवहार हे मोठे आहे..पुराव्यावर चालणारा न्यायव्यवहार व न्यायव्यवस्था वर कोणीच बोलायला तयार नाही?.लोकशाहीचा खूण होत आहे.. परीवर्तन करणाऱ्याच्या जीवनात त्रास सुरू झाला आहे..भाजपचे उमेदवार निवडणुकीच्या आधी विजयी घोषित होतात..मतदानाचा अधिकार दिला पण चांगल्या माणसाला परत करण्याचा कायदा व्हावा..काही देशात ईडी व सिबाआयचे अधिकार काढले आहेत.. ते आपल्या राज्यात सत्ताधीश गैरवापर करीत आहेत.. सत्तापरीवर्तनासाठी हि निवडणूक आहे.. पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा
गरीमा कमी करण्याचे काम भाजपचे सरकार करीत आहे..
न्यायालयावर लोकांचा विश्वास राहिला नाही..८० टक्के न्यायधिश चांगले आहेत पण २० टक्के हे विकले गेले आहेत..सत्ता हस्तगत करण्यात मोठेपणा वाटतो..फडणवीस दोन पक्ष फोडून सत्ता स्थापन करण्यात मोठेपणा मानत असतील तर त्यांना जागा दाखवा..
बहूजन नेत्यांचा अवमान करणारे भाजपचे नेते आहेत.. तरी फडणवीस यावर काही च बोलले नाही.. म्हणजे याचा अर्थ असा आहे हे सगळे पुर्वनियोजित आहे..
शिंदेची सेना नकली आहे तर ठाकरची सेना ओरीजनल आहे.. राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह अजीत पवार यांना दिले पण शरद पवार साहेबांनी याचा सेल काढून टाकला.. भाजप व युती युतीला देशात दोनशे पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, महाराष्ट्रात त्यांना वीस ते बावीस जागा मिळतील लोक त्यांना कंटाळले आहेत
शरद पवार आणि अजित पवार यांचे जे काही भांडण आहे तो त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. यावर एक नागरिक म्हणून एक मतदार म्हणून याचं मला काही घेणं देणं नाही. परंतु कायदेशीर दृष्टिकोनातून पाहता केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे एकीकडे पालन होत नाही आणि हा पायंडा यशस्वी झालेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवून अजित पवारांनी तशाच प्रकारे घटनाबाह्य सरकार स्थापन केलं आहे हे लोकशाहीसाठी घातक आहे, असंही ते म्हणाले. म्हणून २०२४ ची ही.शेवटची निवडणूक आहे.. जनतेने त्यांना घरचा रस्ता दाखवावा असे सांगितले…
सामाजिक कार्यकर्ते डॉ विश्वंभर चौधरी म्हणाले की माझ्यासह देशातील कोणत्याही समाजाचा राम मंदिराला विरोध नाही. मात्र राम मंदिराच्या आडून स्वार्थी राजकारण करणाऱ्यांना विरोध आहे. राम मंदिर अद्याप बांधून पूर्ण झालेले नाही. मग एप्रिलमध्ये येणाऱ्या रामनवमीला का उद्घाटन नाही…तर याचे मुख्य कारण म्हणजे निवडणूका लवकर होत आहेत. अशा राजकारणास आमचा विरोध आहे,’ असे ज्येष्ठ विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी सांगितले.
चौधरी पुढे म्हणाले, “संविधानाचे राज्य येणार की मनुस्मृतीचे, हे ठरणार असल्याने लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वांनी सामाजिक सुरक्षिततेसाठी मतदान करणे गरजेचे आहे
, “निर्भय बनो आंदोलनाचा विरोध मोदी-शहांना नाही, तर त्यांच्या स्वार्थी राजकारणाला आहे. मोदी-शहा कधीच देशाच्या विकासावर बोलत नाहीत. ते नेहमीच खोटी भाषणे करून समाजामध्ये द्वेष पसरविण्याचा प्रयत्न करतात. भाषणातून जर मुस्लिम,
, दहशतवाद, पाकिस्तान, धर्म असे शब्द गाळायला सांगितले तर मोदी-शहा तीन मिनिटेही बोलू शकणार नाहीत.”
भाजपाला जय श्रीराम हा राजकीय नारा करायचा आहे..राज्यात ४५७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या यावर ते बोलत नाही, मोदीने आजतागायत एकही पत्रकार परीषद घेतली नाही,मा.पंतप्रधान
,डॉ मनमोहन सिंगाने १४३ पत्रकार परिषद घेतल्या हा दोघामधला फरक आहे.. लोकशाही एका व्यक्तीवर चालत नाही.. असे त्यांनी सांगितले म्हणून लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये लोकशाही वाचवण्यासाठी व संविधान वाचवण्यासाठी ही लढाई आहे.. आता नाही तर कधीच नाही म्हणून तमाम नागरिकांनी महाविकास आघाडीला मतदान करून हुकुमशाही अस्त करावा असे सांगितले..
विचार पिठावर प्रा अशोक पवार, श्याम पाटील, वासंती दिघे, प्रा. गौतम मोरे, रियाज मौलाना,प्रा.डॉ लिलाधर पाटील होते… व्याख्यानमालेत व्याख्याते एडवोकेट असीम सरोदे व सामाजिक कार्यकर्ते डॉ विश्वंभर चौधरी यांचा बुके व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला..
निर्भय बनो जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी प्रा.अशोक पवार, श्याम पाटील,, सचिन बाळू पाटील , अनंत निकम, संदीप घोरपडे,,प्रा.लिलाधर पाटील,डि.एम.पाटील, , गौतम मोरे , दयाराम पाटील , दत्ता संदानशिव , वैशाली शेवाळे , सारंग लोहार , अनिरुध्द शिसोदे , उज्वल मोरे , शुभम पवार
सह विद्रोही साहित्य संमेलनातील सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य केले. यावेळी व्याख्याना साठी साने गुरुजी शाळेचे पटांगण भरगच्च भरलेले होते.. सूत्रसंचालन लीलाधर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डी एम पाटील यांनी मानले..




