1 min read

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांचेकडून जाणून घेतले, लोकसभा निवडणुकीचे नियोजन. – जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे

Loading

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांचेकडून जाणून घेतले, लोकसभा निवडणुकीचे नियोजन. – जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे

अमळनेर प्रतिनिधी-
संपूर्ण महाराष्ट्रभर वाऱ्याच्या वेगाने दौरा करत महाविकास आघाडीला विजयी करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले अत्यंत सूक्ष्म पणे लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचे नियोजन करत आहेत. त्या अंतर्गत जळगाव जिल्हा काँग्रेसचे बाळासाहेब प्रदीप पवार यांच्याशी जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा उमेदवार श्रीराम पाटील व करण पवार यांच्या प्रचाराच्या नियोजनात आघाडीवर असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची व त्यांच्या प्रचार पद्धतीची परिपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तसेच जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा गट व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते व कार्यकर्ते यांचा समन्वय कसा आहे, त्यांच्या प्रचाराच्या अडीअडचणी काय आहेत, प्रचार करताना जळगाव जिल्ह्यात कशा प्रकारची रणनीती वापरली जात आहे, त्याचप्रमाणे जनतेचा आक्रोश, तसेच महाविकास आघाडीला मिळत असलेला प्रतिसाद, कॉर्नर मीटिंग तसेच मोठ्या गावांमधील सभा व बाहेरून मोठ्या नेत्यांना विचारवंतांना बोलावून जनतेसमोर सरकारने केलेली फसवणूक, शेतकर्यांचे होणारे नुकसान, तरुणांना बेरोजगार करण्याचे षडयंत्र, महिलांचा होणारा सतत अपमान, व एकूणच देश पातळीवरील हिंसात्म राजकारणाची दिशा, यासह काँग्रेस सरकारने आपल्या कार्यकाळात भारतीय संविधानाच्या आधारावर देशाची विकासाच्या दिशेने होणारी वाटचाल व सर्व जाती, धर्म, पंथ, वर्ग, वर्ण यांना एकत्र करून एकात्मतेची भावना निर्माण केलेली होती, देश सुस्थितीत आणून ठेवला होता. ती सारी घडी विस्कटण्याचे काम भारतीय जनता पक्षाने साम दाम दंड भेद नीती वापरून राजकारणाचे मानके बदलवली आणि या साऱ्यांना तोंड देण्यासाठी आपले काँग्रेस कार्यकर्ते अधिक चिकाटीने अभ्यासात्मक पद्धतीने आम जनतेशी संवाद कसा साधतात, अशी सारी माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांचेकडून नानासाहेबांनी घेतली याप्रसंगी या चर्चेत सहभागी होण्यासाठी जळगाव येथून ज्ञानेश्वर कोळी, जमील भाई सरचिटणीस, जळगाव जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष डीडी नाना, युवक काँग्रेसचे आशुतोष पवार, तालुकाध्यक्ष भागवत सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे, व धुळे येथील आमदार कुणाल बाबा पाटील, धुळे जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर, तसेच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस युवक निरीक्षक पैठणकर उपस्थित होते.
नानासाहेब पटोले हे संपूर्ण महाराष्ट्राचा लेखाजोखा घेत असताना जळगाव जिल्ह्याची स्थिती ऐकून समाधान व्यक्त केले व उपस्थितांना आणखी विविध प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या सांगून अशा रणरणत्या उन्हात जीवाची काळजी न करता फिरणाऱ्या नेत्या व कार्यकर्त्यांविषयी समाधान व्यक्त केले व हीच आपली काँग्रेस पक्षाची ताकद आहे.यातूनच आपल्याला भविष्यातील महाराष्ट्र घडवायचा आहे.हा पुरोगामी महाराष्ट्र देशाला दिशा देणारा आहे.संपूर्ण देशामध्ये चांगली कामे सुरुवात महाराष्ट्रातून होते याची जाण संपूर्ण भारताला आहे. त्यामुळे आपल्या जबाबदाऱ्या ओळखा व अधिक सक्षम पणे या लोकसभा निवडणुकीला सामोरे जा पुढच्या निवडणुकांचे वेध लागलेले आहेत.त्याचीही तयारी असू द्या, असा मोलाचा सल्ला देत नाना पुढील जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी मार्गस्थ झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *