कल्याण येथे संत शिरोमणी गोरोबा कुंभार यांची पुण्यतिथी साजरी
![]()

कल्याण येथे संत शिरोमणी गोरोबा कुंभार यांची पुण्यतिथी साजरी
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) खान्देश कुंभार समाज मंडळ कल्याण च्या वतीने संत शिरोमणी, वैराग्याचे महामेरू, राष्ट्रसंत गोरोबाकाका कुंभार यांची 707 वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. खानदेशातील विविध जिल्ह्यातील कुंभार समाज कल्याण परिसरात मोठ्या प्रमाणात स्थायिक झाला आहे कुंभार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या जीवन परिचय त्यांचे कार्य,त्यांचे अभंग या सर्वांची माहिती नवीन पिढीला देखील व्हावी तसेच लोकांनी एकत्र येऊन वैचारिक देवाणघेवाण करावी यासाठी खान्देश कुंभार समाज मंडळ कल्याण विविध कार्यक्रमांचे आयोजन करते.खान्देश कुंभार समाज कल्याण मंडळाचे अध्यक्ष रमेश मोरे,नारायण महाले,रंगराव मोरे,भगवान कुंभार,संजीव सोनावणे, गुलाब चव्हाण,अशोक वाघ,देवानंद चव्हाण,मधुकर कुंभार,चित्ते सर,अर्जुन बोरसे,प्रकाश बोरसे,बाळासाहेब म्हस्के, आत्माराम सोनावणे,नरेंद्र मोरे,एकनाथ सोनवणे, यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच श्री.स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रतिमा पूजन केले. या कार्यक्रमासाठी जगदीश मोरे,प्रकाश कुंभार, गुलाब वाघ,शैलेश चव्हाण,विकास मोरे,चेतन मोरे,संतोष महाले,योगेश मोरे,नितीन सूर्यवंशी, किशोर चव्हाण, विजय मोरे,शुभम मोरे,जगदाळे, बोरसे सर,महाले, इ.पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. गुलाब चव्हाण यांनी सपत्नीक गोरोबाकाका यांच्या प्रतिमेचे पूजन केले. आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचाल.अनिरुद्ध चव्हाण यांनी केले.समाज मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगदान दिले. या कार्यक्रमाला अनेक समाज बांधव व अनेक महिला मंडळ, बाल गोपाळ देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.सामाजिक कार्यात सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे कार्यक्रम यशस्वीपने संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी जगदीश मोरे,प्रकाश कुंभार, गुलाब वाघ,शैलेश चव्हाण,विकास मोरे,चेतन मोरे,संतोष महाले,योगेश मोरे,नितीन सूर्यवंशी, किशोर चव्हाण, विजय मोरे,शुभम मोरे,जगदाळे, बोरसे सर,महाले,यांनी विशेष परिश्रम घेतले.

