सुनील इंगळे यांना प्रेरणा फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय माणुसकी रत्न पुरस्कार प्रदान
![]()


सुनील इंगळे यांना प्रेरणा फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय माणुसकी रत्न पुरस्कार प्रदान
कल्याण (प्रतिनिधी):
प्रेरणा फाउंडेशन तर्फे बहिणाई ट्रस्टचे अध्यक्ष सुनील इंगळे यांना त्यांनी केलेल्या सामाजिक, सांस्कृतिक व मुक्तपत्रकारितेतील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कल्याण येथील प्र. के. अत्रे नाट्य मंदिरात फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष दीप्ती कुलकर्णी यांच्या हस्ते राज्यस्तरीय माणुसकी रत्न पुरस्कार 2024 देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी आकांत हा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला. किनारा रेसिडेन्शियल स्पेशल चाइल्ड मतिमंद स्कूल, वांगणी यांच्या मतिमंद बालकांच्या मदतीसाठी आयोजित केलेल्या या नाट्यप्रयोगास मदत करून मतिमंद मुलांस आधार दिला. आपले कार्य उल्लेखनीय आहे, त्याचीच परिणीती आपणास माणुसकी रत्न पुरस्कार देऊन संस्थेच्या अध्यक्षा दीप्ती कुलकर्णी यांच्या हस्ते गौरविण्यात आले सुनील इंगळे हे गेली 34-35 वर्षे विविध क्षेत्रात स्वतःला झोकून कार्यरत असताना अनेक विषयांवर विविध वर्तमानपत्रांमध्ये लेख प्रकाशित झाले आहेत विविध 52अधिक राज्यस्तरीय पुरस्कार दोन राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी झाले आहे. ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाचे ते सरचिटणीस आहेत, पती-पत्नी सहित नेत्रदान संकल्प केला असून नुकतेच स्वतः देहदान संकल्प नोंदणी(सायन हॉस्पिटल, मुंबई) केली आहे स्वतः बहिणाई ट्रस्ट स्थापन केलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून खानदेश कन्या, काव्य कन्या, कवयित्री बहिणाबाई चौधरी च्या काव्याचा प्रसार करण्यासोबत सामाजिक जागृतीची जोड म्हणून 114 व्यक्तींनी नेत्रदान संकल्प नोंदणी करण्यास सहकार्य केले आहे,विविध सामाजिक संस्थेची संपर्कात सहभागी असणाऱ्या सुनील इंगळे यांना आजच्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणूनही सन्मानित करण्यात आले,यावेळी त्यांनी प्रेरणा फाउंडेशनचे कौतुक केले, आपल्या मनोगतात ते असे व्यक्त झाले की मुलांचा शारीरिक विकास होतो पण मानसिक विकास होत नाही त्यांना मतिमंद असे म्हटले जाते अशा मुलांवर उपचार व संभाळ करणे जिकरीचे होत असते, प्रेरणा फाउंडेशन मायेच्या मदतीने त्यांच्या पाठीशी उभी राहिली, मानवसेवेला प्राधान्य देत समाजाप्रती त्याची असलेली जाण निश्चितच कौतुकास्पद आहे असे सांगून प्रेरणा फाउंडेशनचे कौतुक केले.
या सन्मानाबाबत गौरव बाबत विविध स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे मा.आमदार बालाजी किनीकर ,इंडिला शैक्षणिक संस्था ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर विजय महाजन,बीबीआरटी इंटरनॅशनल स्कूलचे व सोहम क्लासेसचे संचालक गुणवंत भगाळे सर उत्तर महाराष्ट्र खानदेश परिषदेचे अध्यक्ष विकास पाटील सर, नगरसेवक सुनील वायले, हिंदुराव हेलकर (एमआयडीसीचे अधिकारी),जॉय संस्थेचे हिरवे सर, जनजागृती संस्थेचे संस्थापक गुरुनाथ तिरपणकर, लेवा गणबोली चे तुषार वाघुळदे, कवयित्री अनिता कळसकर व लता पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

