1 min read

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र दिन साजरा. राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थामध्ये महाराष्ट्र दिन संपन्न

Loading

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र दिन साजरा. राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थामध्ये महाराष्ट्र दिन संपन्न

मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र राज्याच्या ६५व्या स्थापना दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आज गौरवगीत गायनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिवाजी पार्क येथील मुख्य शासकीय सोहळ्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडाभवन येथे ६५ व्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त (जी उत्तर) अजितकुमार आंबी आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् गायनाने करण्यात आली. महानगरपालिकेच्या संगीत अकादमीच्या वाद्यवृंदाने यावेळी देशभक्तीपर गीतांचे वाद्य संगीताच्या माध्यमातून सादरीकरण केले. यावेळी राज्यपालांनी संगीत अकादमीच्या सर्व कलाकारांचे अभिनंदन केले.राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री गोविंदराजन श्रीनिवासन सरांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक व ऐतिहासिक परंपरेची महती उपस्थीत शिक्षक वर्गांना करुन दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *