1 min read

महाराष्ट्र दिनाचा पोलीस मुख्यालय संचलन पथकामध्ये आर एस पी बालसैनिंकांचा सक्रीय सहभाग.

Loading

महाराष्ट्र दिनाचा पोलीस मुख्यालय संचलन पथकामध्ये आर एस पी बालसैनिंकांचा सक्रीय सहभाग.

रस्ता सुरक्षा साठी आर एस पी अधिकारी युनिट व बाल सैनिकांचे महत्वपूर्ण योगदान आहे.,:डॉ. विनयकुमार राठोड.

ठाणे कल्याण प्रतिनिधी)ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत, १ मे महाराष्ट्र दिनाचा निमित्ताने, परेडमधे ठाणे जिल्हा वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ.विनयकुमार राठोड यांचा आदेशानुसार,परेड अधिकारी, सहाय्यक पोलिस उपायुक्त श्री . घिर्डिकर साहेब व श्री.राजेंद्र कुत्तुल साहेब,यांचा प्लॉटूनप्रमाणे, संकल्प इंग्लिश विद्यालय ठाणे,श्री.गजानन विद्यालालय कल्याण येथील आर एस पी बालसैनिक पथकाने सक्रीय सहभाग घेतला.यासाठी आर एस पी संघटन नागपूर अंतर्गत महासमादेशक श्री.अनिल शेजाळे यांचा मार्गदर्शनाखाली विभागीय समादेशक मनिलाल शिंपी ,दिलीप स्वामी,यांचा नेतृत्वाखाली, ठाणे जिल्हा उपसमादेशक जितेंद्र सोनवणे , आर एस पी अधिकारी शिक्षक बाळासाहेब साठे,बापू शिंपी, करनसिंह जडेजा यांनी विशेष परिश्रम घेतले. माननीय ठाणे जिल्हाधिकारी श्री अशोक शिंगारे साहेब यांच्यासह पोलीस आयुक्त श्री.आशुतोष डूमरे साहेब यांनी आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट आणि बालसैनिक पथकाचे अभिनंदन आणि कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *