1 min read

स्नेहल सामंत यांना कर्तव्यदक्ष समाजसेविका पुरस्कार

Loading

स्नेहल सामंत यांना कर्तव्यदक्ष समाजसेविका पुरस्कार

श्याम ठाणेदार
मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्र विद्या विकास मंडळ संचालित पंत वालावलकर विद्यालय कुर्ला पूर्व येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका स्नेहल सामंत यांना नुकताच जॉय संस्थेच्या वतीने आदर्श समाजसेविका पुरस्कार संस्थापक गणेश हिरवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.मुख्याध्यापक असताना अनेक विद्यार्थी सामंत मॅडमनी घडविले की आज ते विविध ठिकाणी मोठ मोठ्या ह्युदांवर काम करतात तसे त्यांच्या मुख्याध्यापक पदाच्या कारकीर्दीत शाळेने विविध स्पर्धेत अनेक पारितोषिके प्राप्त केली.सध्या महाराष्ट्र मंडळाच्या कोषाध्यक्ष म्हणून त्या कार्यरत आहेत.आजही शाळेची त्यांची नाळ पूर्वीप्रमाणेच जोडलेली आहे.शाळा, विद्यार्थी, शिक्षक यांचेसाठी काय चांगले करता येईल यासाठी त्या सातत्याने पुढाकार घेत असतात.पुरस्कार मिळाल्याने शाळेतील शिक्षक, विद्यार्थी सर्वांनीच त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *