1 min read

1 मे पासून जळगाव येथे पोलीस भरती प्रशिक्षण.युवकांना अभ्यासिका,ग्रंथालय तसेच मैदानी प्रशिक्षण विनामूल्य उपलब्ध

Loading

1 मे पासून जळगाव येथे पोलीस भरती प्रशिक्षण.
युवकांना अभ्यासिका,ग्रंथालय तसेच मैदानी प्रशिक्षण विनामूल्य उपलब्ध

जळगाव – महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेला वेग देण्यात आलेला आहे. 17741 पदांसाठी होणाऱ्या या पोलीस भरतीच्या मैदानी सरावाबाबत तसेच लेखी परीक्षेबाबत शासनाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे या भरतीसाठी युवक युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी नोबेल फाउंडेशन संचलित यशवर्धिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे सदरक्षण पोलीस भरती प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत प्रथम तुकडी प्रशिक्षण संपन्न झाले असून दुसरे प्रशिक्षण वर्ग एक मे पासून सुरू होत आहेत. या अंतर्गत दिनांक एक व दोन मे रोजी निशुल्क सेमिनार व निवड प्रक्रिया सकाळी दहा ते एक या वेळात नोबेल फाउंडेशनच्या सभागृहात प्रगती शाळेसमोर संपन्न होणार आहे. सदर प्रशिक्षण वर्ग एक मेपासून सुरू होत असून उमेदवारांना अभ्यासिका ,ग्रंथालय तसेच सराव परीक्षा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.तसेच विनामूल्य मैदानी प्रशिक्षण संपन्न होणार आहे. तरी युवक व युवतींनी या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक जयदीप पाटील यांनी केलेले आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी +919175548089 येथे संपर्क साधावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *