1 min read

अमळनेर तालुक्यात हिवताप दिवसा निमित्ताने केली आरोग्याविषयी जनजागृती..

Loading

अमळनेर तालुक्यात हिवताप दिवस साजरा
अमळनेर प्रतिनिधी…
अमळनेर तालुक्यातील हिवताप दिवस साजरा करण्यात ग्रामीण विभागातील मलेरिया विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी लढा मलेरिया हरवण्यासाठी”या घोषवाक्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अमळनेर तालुक्यातील तालुक्यात स्तरीय सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर जागतिक हिवताप दिवससाजरा करण्यात आला हिवताप रोगाविषयी जनजागृती व उपाय योजना हिवतापाचे निर्मूलन करण्याबाबत जनसामान्याच्यां मनात रुजून गावागावांमध्ये ही हिवताप बाबत जनजागृती करण्यात आली.आहे हस्त पत्रिका वाटप करण्यात आल्या कीटक शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले तसेच आजारी तापाच्या रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले व डास उत्पत्ती स्थानकांमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले तसेच बस स्थानक व रेल्वे स्टेशन वर येणाऱ्या प्रवाशांना हिवतापाविषयी जनजागृती करण्यात आली ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती व स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले हिवतापाचे निर्मूलन करण्यासाठी आवाहन करण्यात आले सदर कार्यक्रम साठी . जिल्हा आरोग्य अधिकारी श्री डॉ.सचिन बाहेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तुषार देशमुख, डॉक्टर बाळासाहेब वाभळे जिल्हा सात रोग अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी श्री गिरीश गोसावी व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रशांत फुगे, (आरोग्य पर्यवेक्षक) हिवताप यांनी तालुकास्तरीय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र ठिकाणी हिवताप हिवतापा संदर्भात मार्गदर्शन व उपाय योजना करण्यासंदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *