साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्रात उपायुक्त व तज्ञ मार्गदर्शकांचे अनमोल मार्गदर्शन!!!
![]()

साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्रात उपायुक्त व तज्ञ मार्गदर्शकांचे अनमोल मार्गदर्शन!!! अमळनेर नगरी म्हटली म्हणजे त्यात सामाजिक, अध्यात्मिक, वैचारिक, शैक्षणिक याबाबत मार्गदर्शन मिळणारी नगरी होय. यात नाविन्यपूर्ण भर पडली ती साने गुरुजी मोफत स्पर्धा केंद्राची.... ह्या केंद्राची वैशिष्ट्य म्हणजे कुणाकडून पाच पैसे फि न घेता सुरु असलेले स्पर्धा परीक्षा केंद्र होय. साने गुरूजी वाचनालयाच्या सेवाभावी, त्यागी वाचनालयाच्या संचालक मंडळाने होतकरु, मेहनती, कष्टाळु सर्व जाती धर्माच्या मुलामुलींसाठी सुंदर प्रकारे हा अभ्यासवर्ग मार्गदर्शक मा. विजय पवार सरांच्या नियोजनबद्ध तसेच सामाजिक ॠण फेडणार्या अधिकाऱ्यांमार्फत चालविला जातो. मा. संदिप कुमार साळुंखे, कपिल पवार, विशाल महाजन, शरद कोळी त्याप्रमाणेच यजुर्वेद महाजन, जयदिप पाटील, रामचंद्र पाटील त्याप्रमाणेच अनेक तज्ञांच्या मार्गदर्शनाने हा वर्ग चालतो. रविवार 21 एप्रिल ला जळगाव येथून मा. रामचंद्र पाटील व जयदिप पाटील हे इतिहास व विज्ञान विषयाच्या मार्गदर्शनासाठी आले. इतिहासातील सर्व बारकावे रामचंद्र पाटील सरांनी पटवून दिले. इतिहास ह्या विषयावर प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक युगावर येणारे प्रश्न कशाप्रकारे विचारले जातात. महापुरुषाची माहिती कशी लक्षात ठेवावी याबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर मा. जयदिप पाटील यांनी विज्ञान विषयाची सुरुवात कोणत्या इयत्तेपासुन करावी. विज्ञान विषयासाठी कोणती पुस्तके वाचावी. विज्ञान कसे लक्षात ठेवावे याबाबत सविस्तर माहिती दिली. उपायुक्त मा. कपिल पवार आदिवाशी विभाग नाशिक यांनी भूगोल विषयाचा अभ्यासासाठी काय वाचावे, त्यासाठी कोणती पुस्तके संदर्भासाठी घ्यावे, अभ्यास कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आलेल्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. यावेळी पत्रकार अजय भामरे व एस. एच. भवरे उपस्थित होते. सुत्रसंचालन मा. विजय पवार यांनी केले.

