1 min read

विधायक : मातोश्री सेवाभावी संस्थेचे संचालक आशुतोष जगदाळे यांचे सलग पाचव्यांदा रक्तदान; धुळ्याच्या मूकबधिर पुर्नवसन संस्थेलाही आर्थिक मदतीचा धनादेश!

Loading

विधायक : मातोश्री सेवाभावी संस्थेचे संचालक आशुतोष जगदाळे यांचे सलग पाचव्यांदा रक्तदान; धुळ्याच्या मूकबधिर पुर्नवसन संस्थेलाही आर्थिक मदतीचा धनादेश!

जैताणे-निजामपूर (ता.साक्री) : येथील मातोश्री सेवाभावी संस्थेचे संचालक तथा लुधियाना (पंजाब) येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आशुतोष जगदाळेने आपल्या वाढदिवसानिमित्त सलग पाचव्यांदा रक्तदान करून युवा वर्गाला रक्तदानाचा अनोखा संदेश दिला आहे. आशुतोष गेल्या पाच वर्षापासून सातत्याने आपल्या वाढदिवसानिमित्त स्वेच्छेने रक्तदान करीत असून यापूर्वी आशुतोषने धुळे सिव्हिल हॉस्पिटल, नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटल व लुधियाना (पंजाब) सिव्हिल हॉस्पिटल येथील शासकीय रक्तपेढीत रक्तदान केले आहे. मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरातही आशुतोषने रक्तदान केले आहे. विशेष म्हणजे पाचही वेळा आशुतोषने शासकीय रक्तपेढीतच रक्तदान केले आहे जेणेकरून गरजू व गोरगरिबांना त्याचा लाभ मिळू शकेल.

दरम्यान आशुतोषच्या जन्मदिनानिमित्त मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे धुळे येथील मूकबधिर पुनर्वसन संस्थेलाही आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. मूकबधिर पुनर्वसन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना पाटील यांच्याकडे मातोश्री सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे यांनी हस्ते आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला. जैताणेचे माजी सरपंच संजय खैरनार व मूकबधिर विद्यालयाचे कर्मचारी संजय भदाणे आदी यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ नेते ऍड.शरदचंद्र शाह यांच्या प्रेरणेने हा छोटेखानी उपक्रम राबविण्यात आला. त्याबद्दल मुख्याध्यापिका श्रीमती पाटील यांनी मूकबधिर पुनर्वसन संस्थेतर्फे ज्येष्ठ नेते ऍड.शाह यांच्यासह मातोश्री सेवाभावी संस्थेच्या संचालक मंडळाचेही आभार मानले. मातोश्री सेवाभावी संस्थेचे सचिव सुशीलकुमार जगदाळे यांनी युवावर्गाला आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करण्याचे व वैविध्यपूर्ण विधायक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *