जाधव इंग्लिश क्लासेस ची दशसूत्री…
![]()

जाधव इंग्लिश क्लासेस ची दशसूत्री…
1)इतर क्लासेस च्या तुलनेत माझी फि हि मेहनतीच्या मानाने खूपच कमी आहे.
2) इतर बरेच क्लासेस प्रॅक्टिसच्या नावाखाली इ.10 वी बोर्डाचा महत्वाचा अभ्यासक्रम परीक्षेच्या कमीतकमी 2 महिने आधी संपवितात.
3)) मी माझे काम इमाने इतबारे करीत असतो.
मी शेवटच्या 2 महिन्यात 2 तास शिकवीत असतो व टेस्ट साठी स्वतंत्र वेळ देत असतो.
4) इतर बरेच क्लासेस वाले स्वतः घाईत शिकवीत आणि प्रिंटेड नोट्स अथवा एखादे रेडिमेड पब्लिकेशन ( Reference Book ) देऊन स्वतःची मेहनत वाचवितात.
👉 याऊलट आम्ही प्रत्येक टॉपिक कुठलीही घाई न करता सविस्तर शिकवितो.जेणेकरून मुलांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाढते.
5) इतर बरेच क्लासेस वाले मुलांना घोकमपट्टी / पाठांतराची चुकीची पद्धत अवलंबवायला लावतात. त्याने मुलांची हमाली /ताण वाढतो व त्यांचा (इतर क्लास वाल्यांचा ) वाचतो.
👉 याऊलट आम्ही मुलांना पाठांतराची घाणेरडी सवय लावतच नाहीत. आमची मुलं स्वतः उत्तरे व लेखन कौशल्याचे टॉपिक्स तोंडी लिहु शकतात.
6) इतर क्लास मध्ये वर्षभर स्वतः सोपी टेस्ट काढुन मुलांना भरभरून मार्क्स कशे मिळतील याची विशेष काळजी घेतात.जेणेकरून मुल आणि आपण पालक हि खुश ! परंतु पुढे आपली मुलं भविष्यातील आव्हानात्मक प्रवेश परीक्षेत टिकत नाहीत.
👉याउलट आमच्या टेस्ट मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची काठिण्याची पातळी हि कुठल्याही क्लास मध्ये होणाऱ्या टेस्ट पेक्षा वरची असते. (पुराव्यासाठी केव्हाही भेटा)
जेणेकरून मुलांच्या बौद्धिक विकासाचा आलेख झपाट्याने वाढतो व त्यांना कठीण प्रश्न सोडविण्याची सवय लागते.
7) ज्या दिवशी टेस्ट असते त्या दिवशी कुठलाच क्लास वाला शिकवीत नाही.
परंतु मी टेस्ट ला स्वतंत्र वेळ देत असतो जेणेकरून शिकविणे त्यादिवशी बंद राहायला नको.
👉 मागील वर्षी माझ्या 60 पेक्षा अधिक टेस्ट्स झाल्या पण मी 60 दिवस शिकविणे बंद केले नाही.


8) इतर बरेच क्लास वाले स्वतः टेस्ट तपासत नाहीत. परंतु मी तसे करत नाही. स्वतः टेस्टचे मुल्यमापन करीत बारकाईने तपासत सुक्ष्म चुका लक्ष्यात आणुन देतो.
9) वर्षभर इंग्रजी विषय शिकविण्यासोबतच आम्ही विद्यार्थ्यांना Career Guidance हि करत असतो आणि म्हणुनच आमचा इंग्रजी विषय असुन देखील आमचे असंख्य विद्यार्थी नामांकीत कंपनीत इंजिनियर्स आणि MBBS ( डॉक्टर्स) झालेले आहेत.
10)आम्ही विध्यार्थी हितासोबतच शिस्त व गुणवत्ता हि जोपासतो.म्हणुनच आमचेच जास्तीत जास्त विद्यार्थी उच्चपदावर कार्यरत आहेत.
हे सर्व मी प्रामाणिक पणे करतो कारण मला हे चांगले माहित आहे कि सर्व गोष्टींचे नुकसान भरून निघते पण अभ्यासात झालेले ( शैक्षणीक ) नुकसान भरून निघत नाही.शिवाय मी प्रामाणिकपणे मेहनत करेल तर माझा क्लास टिकेल, मी टिकेल हे मला चांगले माहित आहे यात माझाही स्वार्थ आहे आणि आपलाही फायदा !
याहीपलीकडे आपले काही सुचाव अथवा शंका असतील तर आम्हाला नक्की कळवा.
कारणआपल्या पाल्ल्याची प्रगती …आमची प्रगती…आणि आपलीही प्रगती…!
धन्यवाद,
विद्यार्थी व पालक हितार्थ,
जाधव सर 🙏🙏

