सत्ता व संपत्तीच्या जोरावर निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांना दाखवून द्या की मुंबईत पैसा नही चलेगा काम चलेगा – मनोहर कदम
![]()

सत्ता व संपत्तीच्या जोरावर निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांना दाखवून द्या की मुंबईत पैसा नही चलेगा काम चलेगा – मनोहर कदम
जेव्हा शिक्षक संघटना आणि शिक्षक संघटनांचे आमदार शिक्षक मतदारसंघात निवडून येत होती तेव्हा अतिशय सचोटीने प्रामाणिकपणे केवळ शिक्षकांच्या प्रश्नांविषयी अस्था असणारे शिक्षक संघटनांचे उमेदवार हे केवळ शिक्षण क्षेत्रातील समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करत. त्यांनी कधीही प्रलोभने देऊन मत विकत घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. परंतु जेव्हापासून शिक्षण क्षेत्रात पक्ष आणि पक्षांच्या संघटनांचा शिरकाव झाला तेव्हापासून ही संस्कृती बदलत गेली सुस्कृत शिक्षण क्षेत्रात नवीन पक्षीय संस्कृती रुजू लागली. जेवणावळी व पार्ट्या देणे यासारखे पक्षांमध्ये चालणारे प्रकार शिक्षण क्षेत्रातही सुरू झाले. शिक्षकांनी देखील अशा उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहायचे की नाही याचा आपल्या सद्सद विवेकबुद्धीने विचार करुन ठरविले पाहिजे. तसेच शिक्षक संघटना आणि शिक्षक संघटनांच्या प्रामाणिक उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. याचा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. रात्र वैऱ्याची असून सावध भूमिका घेऊन आपलं भविष्य सुरक्षित करायचं असेल आणि शिक्षण क्षेत्रात जो अनागोंदी कारभार निर्माण झाला आहे त्याला आळा बसावयाचा असेल तर शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात सावध होऊन यांचे मनसुबे नेस्तनाबूत करणे गरजेचे आहे. तरी येणाऱ्या निवडणुकीत आम्ही ” पक्ष नको संघटना हवी “ ब्रीदवाक्य घेऊन पुढे चाललो आहोत. अनेकांना हे मनोमन पटते परंतु समोरासमोर विरोध करणे अनेक शिक्षकांना शक्य नसल्यामुळे काही शिक्षक व मुख्याध्यापक ना इलाजस्तव उपस्थित राहत आहेत. त्यांना कारण सतत फोन करून आमंत्रण दिले, बोलवले जाते. अशा पद्धतीने पार्ट्या देऊन मत विकत घेणारे उद्या आपल्यासाठी भविष्यात उपलब्ध होतील का? नाही ना नसतीलच कारण अठरा वर्ष आपण पाहिले ज्यांना आपण आपल्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षक नसलेल्या व्यक्तीला निवडून दिल्यावर काय होते. त्यांनी 18 वर्षात शिक्षकांच्या समस्या सोडवण्यात प्रयत्न न करता केवळ पुरस्कार व पार्ट्या देऊन शिक्षकांना भुलवत राहिले. परंतु शिक्षकांचे खरे प्रश्न मात्र आज पर्यंत तसेच अनुत्तीर्ण राहिलेले आहेत. हे आपण समजून घेतले पाहिजे तरी येणाऱ्या शिक्षक मतदारसंघातील निवडणूक सर्वांनी शिक्षक संघटनांच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असून आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी एक ठोस निर्णय घेऊन एकत्र येऊन काम केले पाहिजे. आपल्याला एक म्हण माहीतच असेल थेंबे-थेंबे तळे साचे तसेच आपण एक-एक करून एकत्र आल्यास एक वज्रमूठ तयार तयार होईल. त्यामुळे संस्थाचालक धार्जेने उमेदवार व संघटना त्याचप्रमाणे शिक्षक नसलेल्या आमदारांच्या उमेदवार यांना घरचा रस्ता दाखवता येईल. यासाठीच आपल्या संघटनेने संघटनेचे शिक्षक प्रिय उमेदवार श्री ज्ञानदेव लक्ष्मण हांडे यांना उमेदवारी दिली आहे. जर ज्ञानदेव हांडे सर हे शिक्षक आमदार म्हणून निवडून आले तर मुंबईतील प्रत्येक शिक्षकाला कोणत्याही स्पीड बेकर शिवाय आपले प्रश्न थेट मांडणं शक्य होणार आहे व आपल्या समस्या सोडवताना कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाही आज आपल्याला विद्यमान आमदारांना भेटायचं असेल कोणता प्रश्न मांडायचा असेल तरी अनेक स्पीड बेकर ओलांडून आपल्याला पुढे जावं लागतं तरीही आपले काम होत नाही. तसेच स्वतः संस्थाचालक असलेले उमेदवार आपल्या पर्यंत येत आहेत. त्यांनी आज पर्यंत शिक्षकांसाठी रस्त्यावरील कोणते आंदोलन त्यांनी उभे केले का? एसी खोलीत बसून निर्णय घेणे हे त्यांना ठाऊक आहे असे दिसते. परंतु रस्त्यावरील शिक्षकांची लढाई श्री ज्ञानदेव हांडे सर मागील पंधरा-वीस वर्षापासून लढत असून विनाअनुदानित आजचे प्रश्न असोत, प्लॅन टू नॉन प्लॅन ची समस्या त्यावरील लढा असेल, समायोजित शिक्षकांच्या समस्या असतील, संच मान्यतेतील त्रुटी याबाबतचा पाठपुरावा असेल, त्याचप्रमाणे नियमित वेतन, वैद्यकीय देयके, पीएफ व पीएफ वरील कर्ज प्रकरण असेल, शिक्षकांची वैयक्तिक समस्या, जुनी पेन्शन योजना, 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांची जुनी पेन्शन योजना, वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी, एम ई पी एस मधील सेवाजेष्ठतेचे प्रश्न, मुंबईतील प्राथमिक शाळांच्या अनुदानाचा प्रश्न असेल, प्रत्येक शाळेत संगणक शिक्षक मिळावी यासाठीचा लढा, शिपाई, प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, वरिष्ठ लिपिक, सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी, या विविध मागण्यांसाठी रस्त्यावरची लढाई सतत लढत असून आपण मतदानाच्या माध्यमातून ही रस्त्यावरची लढाई सभागृहात लढण्यासाठी आमच्या संघटनेच्या शिक्षक प्रिय उमेदवाराला सक्रिय पाठिंबा देऊन व मतदानाच्या माध्यमातून पाठिंबा देऊन भरघोस मतांनी विजयी कराल हीच अशा आहे. मुंबईमध्ये मोठा बदल घडवून महाराष्ट्रासाठी एक नवा आदर्श निर्माण करून द्याल. सत्ता व संपत्तीच्या जोरावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे मनसुबे आपण उधळून द्या हीच अपेक्षा आहे. सर्वांना सहज उपलब्ध होणारे,सतत संपर्कात असणारे आपल्यातीलच एक आपल्या समस्यांची जाण असणारे सामान्य शिक्षक, श्री ज्ञानदेव लक्ष्मण हांडे सरांच्या माध्यमातून शिक्षक संघटनेच्या उमेदवारांला निवडून देऊन. शिक्षकांसाठी एक नवा अशावाद निर्माण कराल हिच अपेक्षा.
लेखक – महाराराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आहेत.

