1 min read

डॉ.रवींद्र भोळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राइड आयकॉन अवॉर्ड प्रदान

Loading

डॉ.रवींद्र भोळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राइड आयकॉन अवॉर्ड प्रदान
जयपुर राजस्थान: मिनिस्ट्री ऑफ एम. एस. एम. इ .भारत सरकार सलग्नित भावना आर्ट्स व साहित्य परिषदेच्या वतीने नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘प्राइड आयकॉन अवॉर्ड2024’वितरण समारंभ संपन्न झाला. ह्या कार्यक्रमांमध्ये उरुळी कांचन येथील ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, अपंग सेवक व शैक्षणिक , अध्यात्मिक,धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते ह. भ .प. तसेच हिंदू रत्न पुरस्कार विजेते डॉ. रवींद्र भोळे यांना नुकताच भावना शर्मा संस्थापक अध्यक्ष भावना आर्ट्स व साहित्य परिषदेच्या वतीने वरील पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ रवींद्र भोळे यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून निष्काम कर्मयोगी कार्य समर्पित भावनेने केल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. तसेच डॉ. रवींद्र भोळे यांना नुकताच आरोग्य विषयक जनजागृती व दीर्घकाल विविध क्षेत्रात कार्य केल्या बद्दल लंडन येथील वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड. सन्मान प्राप्त झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *