नेपाळ येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत शिक्षक मधुकर चव्हाण यांच्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल खाजगी शिक्षक संघटनेकडून गौरव !
![]()


नेपाळ येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत शिक्षक मधुकर चव्हाण यांच्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल खाजगी शिक्षक संघटनेकडून गौरव !
मुंबई | प्रतिनिधी : संयुक्त भारतीय खेल फाउंडेशन तर्फे नेपाळ येथे नुकतीच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत चेंबुर येथील स्वामी मुक्तानंद हायस्कूलचे माध्यमिक विभागाचे शिक्षक श्री मधुकर चव्हाण सर यांनी गोळा फेक, थाळी फेक, भालाफेक या तिन्ही खेळ प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या अभिमानास्पद कामगीरी बद्दल महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांनी श्री चव्हाण सर यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन कले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोबत संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष मनोहर कदम, महेश चव्हाण, इकबाल देसाई यांनीही शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षक श्री नाईक सर, वरीष्ठ शिक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक विवेक थोरात यांनी देखील श्री चव्हाण सर यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव उल्लेख केला.

