1 min read

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुलेंनाअन चवदार तळ्यावरडॉ.बाबासाहेबांना आंबेडकर यांना अभिवादन

Loading

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुलेंना
अन चवदार तळ्यावर
डॉ.बाबासाहेबांना आंबेडकर यांना अभिवादन

महात्मा फुले विचार अभियानकडून
अभिवादन कार्यक्रम संपन्न

रायगड :स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा वर्षानिमित्ताने तसेच  आद्यशिवचरित्रकार महात्मा फुले यांची १९७ वी जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती निमित्त महात्मा फुले विचार अभियान व फुले प्रेमीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम संपन्न करण्यात आला.रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले.तसेच
महाड येथील चवदार तळ्यावर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यात आले.महात्मा फुले यांनी किल्ले रायगड येथील शिवसमाधीस विनम्र अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा लिहून सामाजिक क्रांतीसाठी पुणे येथे पहिली शिवजयंती साजरी केली होती.या क्रांतिकारी क्रांतिकार्याला उजाळा देण्यासाठी किल्ले रायगड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महात्मा फुले विचार अभियान व फुले प्रेमीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवसमाधी अभिवादन करण्यात आले.महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित शिवप्रेमीना महात्मा फुले यांची प्रतिमा व गौरवपत्र प्रदान करण्यात आले.राजमाता जिजाऊ यांना पाचाड येथे अभिवादन करण्यात आले.महाड येथील क्रांतिस्थळ चवदार तळे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून चवदार तळ्यातील पाणी क्रांतिजल कलशाचे सातारा कडे प्रस्थान झाले.कार्यक्रमांस डॉ.राजू जाधव अध्यक्ष महात्मा फुले सेवा संघ, रायगड, विराज जाधव राहुल जाधव देवासी जी, बाळारामजी, जयसिंग लोखंडे, संपतरावं जाधव,ऍड सुनील नेवसे,राजेंद्र नेवसे, तुकाराम शिंदे,शीतल मालुसरे, कैलास महाजन, सुखदेव कदम व अजित जाधव यांनी विशेष सहभाग नोंदविला.जयसिंग लोखंडे यांनी आपल्या मुलाचा विवाह सत्यशोधक पद्धतीने करून समाजासमोर आदर्श निर्माण केला.डॉ राजू जाधव यांनी महात्मा फुले सेवा संघाच्या माध्यमातून फुले विचारांच्या प्रचार व प्रसार कार्याबद्दल
महात्मा फुले विचार अभियान यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.महात्मा फुले विचार अभियान संकल्पक संपतराव जाधव हे छत्रपती शिवाजी महाराज त्रिशताब्दी राज्यरोहण सोहळाकरिता हजर होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्याभिषेक वर्षात या विशेष उपक्रमास वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी हजर असल्याबद्दल विशेष कौतुक व सत्कार करण्यात आला. किल्ला परिसरामध्ये सेवाभावी कार्य तसेच गडावरील व्यवसायिक महिला भगिनीं यांचे गौरवपत्र देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *