आंधीनी गड, जिका व माय,नांदी तव्हय खरं ओ माय!
![]()
आंधीनी गड, जिका व माय,नांदी तव्हय खरं ओ माय!
आर.आर.पाटील साहेब, आपल्या तातडीच्या कृतीला सॅल्युट

विद्यावर्धिनी समोरील साक्री रोडवर एक खड्डा पडला होता, ‘घरनं झायं थोडं, याहीनी धाडं घोडं’ या शिर्षकाखाली समाजमाध्यमावर वाचा फोडली होती. काल रात्री 9-19 वाजता टाकलेल्या समाज माध्यमावरील पोस्टची दखल घेऊन लगेच 9-38 वाजता उद्या काम करतो म्हणून मला व्हॉटस् ॲपवर संदेश येतो. एव्हढी तातडीची दखल केवळ ‘हृदय’ असलेला माणूसच घेऊ शकतो आणि ते कोमल हृदयाची व्यक्ती म्हणजे धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर. पाटील साहेब हे आहेत. यापूर्वीही त्यांचा गतीरोधकांवरील साईट पट्ट्यांच्या पूर्ततेबाबत त्यांचा अनुभव घेतला होता. एव्हढेच नव्हे तर सुटीचा रविवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सारखा महत्त्वाचा उत्सव असूनही आपल्या यंत्रणेमार्फत त्यांनी संबंधित खड्डे जेसीबीद्वारे मोकळे करून व्यवस्थित भरल्याचे फोटोसह दुपारी 4-02 वाजता मला व्हॉटस् ॲप वर कळविले आर.आर. पाटील साहेब यांच्या सारखे जमीनीवर पाय असलेले एव्हढ्या तातडीने कर्तव्यदक्ष अधिकारी दुर्मिळात दुर्मिळ असतात. जेथे जन्मले त्या मातीचे कर्तव्य भावनेने ऋण फेडण्याची त्यांची भूमिका नक्कीच कौतुकास्पद आहे. जेथे खड्डा दुरुस्त केला तेथे पूर्वी नाला होता. त्याच जागेवर आजुबाजूला नेहमीच खड्डे पडत असतात. आज येथे दुरुस्तीची हॅट्रीक झाली आहे. ही दुरुस्ती पावसाळ्यात टीकली तरी खूप झाले म्हणावे लागेल. परंतु ज्या तातडीने तुम्ही दखल घेतली त्याबद्दल आर.आर. पाटील साहेब कर्तव्यपूर्तीबद्दल आपणास माझा सॅल्युट! तरीही सरकारी कामांचा सार्वजनिक अनुभव पहाता ‘आंधीनी गड जिका व माय, नांदी तव्हय खरं ओ माय’ असे होणार नाही असे मनोमनी वाटते. खड्डा कायमस्वरुपी बुजला जाईल आंधीना नांदीप्रमाणे शंका नसेल अशी ज्येष्ठ पत्रकार गो. पि. लांडगे यांनी अपेक्षा व्यक्त केली

