मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.—
![]()

मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.—
मारवड येथील कला महाविद्यालयात दि.14 एप्रिल 2024 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले हे होते,सदर कार्यक्रम विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी डॉ. दिलीप तुकाराम कदम यांनी डॉ .आंबेडकरांच्या विचारांवर विशेषतः लोकशाही विचारांवर प्रकाश टाकला. यानंतर प्राचार्य डॉ. वसंत देसले सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान निर्मितीचे ओजस्वी कार्यावर आपले व्याख्यान दिले. व त्यांनी तत्कालीन परिपक्षात कशा स्वरूपात संविधानात जगातील सर्वच बाबींचा अंतर्भाव केला यावर प्रकाश टाकला.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. डॉ. जितेंद्र माळी, प्रा. विजय पाटील,डॉ. पवन पाटील, डॉ.संजय महाजन, डॉ.संजय पाटील, डॉ. नंदा कंधारे, डॉ. सतीश पारधी, प्रा. विश्वनाथ पाटील डॉ. देवदत्त पाटील यासह शिक्षकेतर कर्मचारी श्री .जगदीश साळुंखे ,श्रीमती. मंजुषा गरुड,श्री. सचिन पाटील , श्याम पाटील, दीपक पाटील, सचिन साळुंखे अतुल साळुंखे, दिलीप चव्हाण , आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

