जि. प .प्राथ .शाळा दहिगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी!
![]()

जि. प .प्राथ .शाळा दहिगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी!
जि. प.प्राथमिक शाळा दहिगाव ता. यावल जि. जळगाव येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दहिगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. विजय ठाकूर हे होते . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण हे केंद्रप्रमुख श्री. विजय ठाकूर व ग्रेडेड मुख्याध्यापक श्रीमती. सरिता जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी केंद्रप्रमुख श्री. विजय ठाकूर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक ,सामाजिक व वैचारिक कार्याचा परिचय करून दिला. शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा,चित्रकला तसेच रंगभरण स्पर्धा यासारख्या उपक्रमात सहभाग घेतला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री. धीरज तायडे यांनी केले. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी ग्रेडेड मुख्याध्यापिका श्रीमती. सरिता जाधव, सौ. वैशाली पाटील, श्री. सुनील पाटील ,श्री .धीरज तायडे, श्री. आसिफ तडवी ,श्री .भटराज शिरसाठ ,सौ. पुष्पा तायडे, श्रीमती. पूनम भोळे, श्रीमती. सोनाली चौधरी तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

