जळगांवमध्ये स्टार्टअप्स वाढी संदर्भात जळगाव स्टार्टअप गृपच्या सदस्यांसोबत स्मिताताई वाघ यांची ‘स्टार्टअप पे चर्चा’
![]()


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
जळगाव लोकसभा क्षेत्र
जळगावमध्ये स्टार्टअप्स वाढी संदर्भात जळगाव स्टार्टअप गृपच्या सदस्यांसोबत ‘स्टार्टअप पे चर्चा’ केली. स्टार्टअप ही संकल्पना आता पुणे-मुंबईपुरता मर्यादित राहिलेली नाही. आपल्या जळगाव जिल्ह्यात अनेक स्टार्टअप सुरु होत आहेत. तरुणाईच्या या स्टार्टअप्समुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होत आहे. येणाऱ्या काळात जळगावला स्टार्टअप हब बनविण्यासाठी माझे प्राधान्य राहिल, असे आश्वासन त्यांना दिले.
या ‘स्टार्टअप पे चर्चा’ या कार्यक्रमात जळगावमध्ये स्टार्टअप संस्कृती वाढण्यासाठी कोणत्या बाबींची आवश्यकता आहे, यावर चर्चा झाली. यावेळी जळगावमधील स्टार्टअप फाऊंडर्संनी त्यांच्या नाविन्यपूर्ण व्यवसायाची माहिती देत, भविष्यात काय केले पाहिजे, याबाबत काही अपेक्षा व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशात स्टार्टअप कल्चर वाढत आहे. यात जळगावची तरुणाई देखील मागे नाही, हे पाहून खूप आनंद झाला.
श्री एजन्सीमध्ये झालेल्या चर्चेत जळगाव स्टार्टअप ग्रृपचे अजिंक्य तोतला, आर्यन मणियार, डॉ. युवराज परदेशी, निखिल जाधव, योगेश चौधरी, तेजस पाटील, तुषार भांबरे, रजत भोळे, निखिल पाटील, मकरंद डाबिर, हरेक सोनी, अभिषेक राकेचा, अकुंर साळूंखे, राहूल जैन, आशुतोष रांगा, निकुंज रांगा, कुश फुले, अक्षय पाटील, मौलिक कुमत, लोकेश काबरा, आकाश पाटील, प्रतिक वरयाणी, अर्चना महाजन यांच्यासह आदी सदस्य सहभागी झाले होते.

