भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी
![]()
भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी
भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंगला सोनवणे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जयंतीनिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग, त्यांचा जीवनपट भाषणातून व्यक्त केला. सौ विजया गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचा अभ्यास करा व सत्य परिस्थितीची जाणीव करून माणूस म्हणून जगा असा संदेश दिला. श्रीमती ज्योतिर्मयी बाविस्कर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्तुती गीत ऐकवले. श्रीमती ललिता गवळी यांनी स्फूर्ती देणारे मराठी शायरी सादर केली. श्रीमती रूपाली पवार यांनी समानतेची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजायला हवी. सौ तृप्ती खैरनार यांनी संत चोखामेळा यांचा जीवनातील प्रसंग सांगितला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौमंगाला सोनवणे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी पाळणा गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका बाविस्कर यांनी केली. कार्यक्रमास उपस्थित सौ शुभांगी शेंदुर्णीकर, सौ सविता देशमुख, श्रीमती मनीषा गवते, सौ दिपाली देसले, सौ विद्या पाटील, सौ राजश्री पाटील, सौ नीता पाटील, सौ कविता पाटील, सौ वैशाली पाटील, सौ कीर्ती ब्रम्हे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होत्या. भाषण देणारे विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


