अडावद आरोग्य केंद्रामार्फत मान्सूनपुर्व जलसुरक्षकांची कार्यशाळा
![]()
अडावद आरोग्य केंद्रामार्फत मान्सूनपुर्व जलसुरक्षकांची कार्यशाळा


सालाबादप्रमाणे ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे व जलजन्य आजारांची साथ उद्भवू नये यासाठी,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांचे आदेशानुसार.. तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर यांचे मार्गदर्शनाखाली,
सम्पूर्ण चोपडा तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांतील गावांना ह्याही वर्षी मान्सूनपुर्व उपाययोजना घेण्यासाठी, पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व स्त्रोतांचे सर्वेक्षण करणे गरजेचे असल्याने, सदरच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने.. आज दिनांक-१३ एप्रिल शनिवार रोजी सकाळी १२ वाजेला प्राआकेंद्र-अडावद अंतर्गत येणाऱ्या १२ खेडे आणि ४आदिवासी पावरा पाड्यातील व सर्व गावांतील पाणी पुरवठा करणारे जलसुरक्षक यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
प्रसंगी भागातील सर्व जलसुरक्षक यांना आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख, वाय आर पाटील, यांनी उपस्थित सर्व जलसुरक्षकांना जलजन्य आजारांची साथ उदभवणार नाही या साठी घ्यावयाची उपाययोजना आणि जलशुद्धीकरण करते वेळी कोणती काळजी घेतली पाहिजे, तसेच गावांत नियमित पाणी पुरवठा करतांना शुद्धीकरण कसे करावे.? Tcl पावडर कसे ठेवावे.? पुरेसा TCL साठा ठेवण्यात यावा,व्हॉल्व गळती, पाईप गळती, पाण्याच्या स्रोतांच्या परिसरात स्वच्छता कशी ठेवावी, पाणी साचणार नाही, या आणि इतर सर्व बाबींची सखोल माहिती देण्यात आली, व योग्य ते मार्गदर्शन केले,
सदर प्रसंगी..
वैद्यकीय अधिकारी-डॉ.अर्चना पाटील, आरोग्य सेवक-कैलास बडगुजर, आर एस पाटील, संतोष भांडवलकर,आरोग्य सहाय्यीका-शोभा चौधरी, आणि इतर सर्व आरोग्य कर्मचारी वर्ग प्रसंगी उपस्थित होते.

